Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात प्रशिक्षणार्थी विमान घसरले ; पायलट सुखरूप
    क्राईम

    जळगावात प्रशिक्षणार्थी विमान घसरले ; पायलट सुखरूप

    editor deskBy editor deskJune 20, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव विमानतळावरील ‘न्यू फ्लाइंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ प्रशिक्षण संस्थेचे प्रशिक्षणार्थी विमान बुधवारी दुपारी दीड वाजता धावपट्टीवर उड्डाण घेत असताना विमानाचा पुढील बाजूचा लैंडिंग गियर निखळल्याने विमान धावपट्टीवर घसरून अपघात झाल्याची घटना घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत विमानाच्या पुढील भागाचे नुकसान झाले असून, सुदैवाने त्यात कोणी जखमी झाले नसल्याची माहिती समोर येत आहे. जळगाव विमानतळावर ‘न्यू फ्लाइंग ट्रेनिंग इन्सिट्यूट’ प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून विमान प्रशिक्षण दिले जाते. बुधवार (दि. १९) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे व्हीटी एलएवाय हे विमान धावपट्टीवरून उड्डाण घेत असताना विमानाच्या पुढील बाजूला असलेला लैंडिंग गियर निखळल्याने हे विमान धावपट्टीवर आदळले. वीस ते तीस फूट अंतरापर्यंत विमान धावपट्टीवर घसरत गेले. या घटनेमुळे विमानतळावरील सुरक्षा यंत्रणाची एकच धावपळ उडाली. या घटनेत विमानातील प्रशिक्षणार्थी पायलट सुखरूप असल्याचे समजते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार अपघातानंतर फडणवीसांचा संवेदनशीलतेचा आग्रह; पतंगबाजी व गोळीबार टाळा

    February 28, 2026

    पॅलेसमध्ये हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; मॅनेजरसह चौघांना अटक

    February 28, 2026

    शिखर बँक प्रकरणात मोठी कलाटणी; सुनेत्रा पवार, अजित पवारांसह ७० जण निर्दोष

    February 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.