Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सॉप्टवेअर इंजिनिअरने घेतली दुसऱ्या मजल्यावरून उडी
    क्राईम

    सॉप्टवेअर इंजिनिअरने घेतली दुसऱ्या मजल्यावरून उडी

    editor deskBy editor deskJune 19, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल : प्रतिनिधी

    उच्च‍ शिक्षित सॉप्टवेअर इंजिनिअरने राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना यावल शहरातील महाजन गल्लीत घडली आहे. आत्महत्येमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अक्षय प्रमोद करांडे (वय २७, रा. महाजन गल्ली, यावल) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय प्रमोद करांडे या तरूणाने १७ जुन रोजी रात्री ८ ते ८ .३० वाजेच्या सुमारास आपल्या महाजन गल्लीतील राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केले असता अक्षय यास गंभीर दुखापत झाली. दरम्यान त्यास रात्री तात्काळ उपचारासाठी भुसावळच्या एका खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले असता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.

    या बाबत अद्याप पोलीसात नोंद करण्यात आली नसल्याचे वृत्त आहे. दरम्यान उच्च शिक्षीत अक्षय करांडे हा पुणे येथे एका खाजगी कंपनीत सॉप्टवेअर अभियंता म्हणुन नोकरीस होता. या तरूणाने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल का घेतले हे मात्र स्पष्ट होवु शकले नाही. अक्षय करांडेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन भुसावळ येथे ट्रामा सेंटर मध्ये करण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार अपघातानंतर फडणवीसांचा संवेदनशीलतेचा आग्रह; पतंगबाजी व गोळीबार टाळा

    February 28, 2026

    पॅलेसमध्ये हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; मॅनेजरसह चौघांना अटक

    February 28, 2026

    शिखर बँक प्रकरणात मोठी कलाटणी; सुनेत्रा पवार, अजित पवारांसह ७० जण निर्दोष

    February 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.