Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भीषण ! जबर अपघातात टँकरखाली चिरडल्याने बालकाचा मृत्यू
    क्राईम

    भीषण ! जबर अपघातात टँकरखाली चिरडल्याने बालकाचा मृत्यू

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJune 18, 2024Updated:June 18, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भडगाव तालुक्यात आई-वडिलांसमोरच घडली घटना !

    जळगाव / पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील बांबरुड फाट्यावर एका टँकरच्या धडकेत दुचाकीवरील १५ वर्षीय बालक चिरडून ठार झाल्याची धक्कादायक घटना सोमवार दि. १७ जून रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.  दरम्यान या घटनेवर पाचोरा पोलीस स्टेशन येथे मंगळवारी पहाटेपर्यंत काहीही दाखल नव्हते.

    राजवीर नरेंद्र भोसले (वय १५ रा. आमडदे ता. भडगाव) असे मयत बालकाचे नाव आहे. त्याचे वडील नरेंद्र भोसले हे आमडदे गावात राहतात. नरेंद्र भोसले यांचा वैद्यकीय व्यवसाय असल्याची माहिती मिळत आहे. सोमवारी दि. १७ जून रोजी नरेंद्र भोसले हे पाचोरा येथे पत्नी, मुलगा राजवीर आणि मुलगी यांच्यासह काही कामानिमित्त आलेले होते. त्यानंतर रात्री दहा वाजेनंतर घरी आमडदे येथे परत जात होते. वाटेत बांबरुड फाट्याजवळ पावसामुळे रस्ते निसरडे झाल्याने त्यांच्या वाहनाला अपघात झाला.

    दुचाकीवरून सर्व खाली पडले. त्यात राजवीर हा जवळून जाणाऱ्या टँकर खाली येऊन चिरडून ठार झाला आहे. डोळ्यादेखतच मुलाचा मृत्यू झाल्यामुळे भोसले परिवाराला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान राजवीर आणि जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. तेथे राजवीर याला मयत घोषित करण्यात आले. तर नरेंद्र भोसले, त्यांच्या पत्नी व मुलीला किरकोळ खरचटल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

    दरम्यान सदर अपघाताबद्दल पाचोरा पोलीस स्टेशन येथे मंगळवारी दि. १८ जून रोजी पहाटे ७ वाजेपर्यंत काहीही दाखल नव्हते. या भीषण अपघातामुळे रस्त्यांच्या दुर्दशेचा विषय पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. अपघातग्रस्त टँकर हे पाचोरा पोलीस स्टेशन येथे जमा झाले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    धरणगावात शांतता समितीची बैठक; सण-उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन, आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टवर कारवाईचा इशारा

    August 2, 2026

    जिल्ह्यातील ६३८ शिक्षकांचे शालार्थ आयडी मनोजच्या माध्यमातून: कोट्यवधींच्या मायाजालाचा धक्कादायक खुलासा?

    July 30, 2026

    बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळा; मनोजसह तीन मराठा नेते SITच्या रडारवर?

    July 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.