Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शस्त्राचा धाक दाखवत वृद्धाला लुटले
    क्राईम

    शस्त्राचा धाक दाखवत वृद्धाला लुटले

    editor deskBy editor deskJune 16, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    ग्रामपंचायतीजवळ बसलेल्या वाल्मिक अंकात बिऱ्हाडे (वय ७२, रा. भोळेनगर, असोदा) यांना दुचाकीवरुन आलेल्यांनी धारदार शस्त्राचा धाक दाखविला. त्यांनी ते शस्त्र वृद्धाच्या मानेवर लावून त्यांच्या खिशातून दोन हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून नेली. ही घटना दि. १४ जून रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास असोदा गावात घडली. याप्रकरणी संशय्तिा वैभव विजय सपकाळे (कोळी), कल्पेश निलेश इंगळे (माळी) व दीपक पुंडलिक उर्फ धनराज सपकाळे (कोळी) या तिघांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील असोदा गावात वाल्मिक बिऱ्हाडे हे वृद्ध वास्तव्यास आहे. दि. १४ जून रोजी सायंकाळी ते ग्रामपंचायतीजवळ बसलेले असतांना त्यावेळी गावातील वैभव सपकाळे हा त्यांच्याजवळ आला. त्याच्यासोबत कल्पेश इंगळे व दीपक उर्फ धनराज सपकाळे हे दोघ देखील होते. दरम्यान, वैभव याने वाल्मिक बिऱ्हाडे यांच्याकडे हजार रुपयांची मागणी केली. तेव्हा त्यांनी माझ्याजवळ पैसे नाही असे सांगितले. त्यावर कल्पेश इंगळे याने त्याच्या कंबरेला खोचलेले धारदार हत्यार बाहेर काढले आणि वृद्धाच्या मानेला लावून पैसे देतो का नाही, तर तुला हत्याराने मास्ना टाकू अशी धमकी दिली. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या वैभव सपकाळे याने वृद्धाच्या खिशातून दोन हजारांची रोकड जबदरस्तीने हिसकावून घेत ते तेथून पसार झाले.

    हा प्रकार तेथून जाणाऱ्या गावातील एकाने बघितला, त्यांनी त्या टवाळखोरांना याबाबत जाब विचारला. मात्र त्यांनी तू इथून चालला जा नाही तर तुला देखील येथेच आडवा पाडू अशी धमकी दिली. दरम्यान, याप्रकरणी बिऱ्हाडे यांनी लागलीच तालुका पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरु न तिघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार अपघातानंतर फडणवीसांचा संवेदनशीलतेचा आग्रह; पतंगबाजी व गोळीबार टाळा

    February 28, 2026

    पॅलेसमध्ये हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; मॅनेजरसह चौघांना अटक

    February 28, 2026

    शिखर बँक प्रकरणात मोठी कलाटणी; सुनेत्रा पवार, अजित पवारांसह ७० जण निर्दोष

    February 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.