Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जम्मू-काश्मीरात दहशतवादी हल्ला : १० भाविक ठार तर ३३ जखमी !
    क्राईम

    जम्मू-काश्मीरात दहशतवादी हल्ला : १० भाविक ठार तर ३३ जखमी !

    editor deskBy editor deskJune 10, 2024Updated:June 10, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    श्रीनगर : वृत्तसंस्था

    जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या एका बसवर अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना रविवारी घडली. या हल्ल्यानंतर नियंत्रण हुकलेली बस थेट दरीत कोसळली. या भ्याड हल्ल्यात १० भाविकांचा मृत्यू झाला, तर ३३ जण जखमी झाले. मृतांमध्ये उत्तर प्रदेशच्या भाविकांचा समावेश आहे.

    केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी या हल्ल्याच्या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत बचाव कार्याबाबत उपराज्यपाल व पोलीस महासंचालकांसोबत चर्चा केली. असा भ्याड हल्ला करणाऱ्यांची हयगय करणार नसल्याचा इशाराही शाह यांनी दिला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या हल्ल्याच्या निषेध केला. शिव खेरी येथील मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर ५३ जणांसह ही बस कटरा येथील वैष्णोदेवीचे दर्शन घेण्यासाठी जात होती. रविवारी सायंकाळी सव्वासहा वाजता तरेयाथ गावाजवळ येताच या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026

    वेळ संपल्याने बँड बंद; पुन्हा वाजविण्यास नकार दिल्याने बँडमालकावर हल्ला !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.