Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गांधलीपुरा येथील महिलेचा उष्माघाताने मृत्यू
    अमळनेर

    गांधलीपुरा येथील महिलेचा उष्माघाताने मृत्यू

    userBy userJune 2, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर प्रतिनिधी |अमळनेर तालुक्यातील गांधलीपुरा येथे २३ वर्षीय महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले. श्रद्धा गौरव वाघ वय-२३, रा. गांधीपुरा, ता. अमळनेर असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.

    या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील गांधलीपुरा येथे श्रद्धा वाघ या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला होत्या. दरम्यान ३१ मे रोजी सकाळी त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना तातडीने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा दुपारी १ वाजता मृत्यू झाला. दरम्यान वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती उष्माघाताने मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणी दुपारी ३ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ अलोक साबळे हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    user
    • Website

    Related Posts

    राज्यात खळबळ : मंदिरात मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न: सीसीटीव्हीत कृत्य कैद !

    October 14, 2026

    देवीच्या दर्शनाहून परतताना दुर्दैवी अंत; कुटुंबाचा आधार हरपल्याने हळहळ

    October 14, 2026

    शाळा सुटल्यानंतरचा प्रवास ठरला अखेरचा : १६ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

    October 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.