Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ब्रेकींग : दुध फेडरेशन येथील राजा मयूर यांच्या बंगल्यावर दरोडा
    क्राईम

    ब्रेकींग : दुध फेडरेशन येथील राजा मयूर यांच्या बंगल्यावर दरोडा

    userBy userMay 31, 2024Updated:May 31, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । राजा ट्रॅक्टरचे मालक राजा मयूर उर्फ राजेंद्र अनिल मयूर यांच्या बंगल्यावर काम करणाऱ्यानेच इतर सहकाऱ्यांच्या मदतीने गुंगीचे औषध सरबत मध्ये ठाकून दरोडा टाकल्याची घटना मध्यरात्री घडली आहे. घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले असून पुढील चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी, जळगाव शहरातील दुध फेडरेशन परिसरात राजा मयूर हे आपल्या पत्नी शैला मयूर यांच्यासोबत वास्तव्याला आहे. त्यांच्या बंगल्यावर दोन सुरक्षा रक्षक आणि घरातील काम करणारा गोपाळ नेपाळी हा कामाला आहे. गोपाळ नेपाळी याने भावाला मुलगा झाला आहे असे सांगून गुरूवारी ३० मे रोजी रात्री १०.३० वाजता बंगल्यावर असलेले दोन सुरक्षा रक्षकांना गुंगीचे औषध टाकून सरबत पाजले. त्यानंतर त्याने हेच सरबत राजा मयूर यांना देखील पाजले. त्यामुळे तिघेजण बेशुध्द झाले. त्यानंतर गोपाळ नेपाळी याने त्यांचे इतर चार साथीदारांना बोलावून मध्यरात्री २ वाजता बंगल्यावर आले. त्यावेळी शैला मयूर यांना स्क्रु ड्रायव्हरचा धाक दाखवत त्यांना बाथरूममध्ये कोंबून ठेवले. त्यानंतर घरातील कपाट, कॉटमधील सर्व सामान अस्तव्यस्त करून घरातून मुद्देमाल व त्यांचे दोन आयफोन चोरून नेले.

    राजा मयूर हे जैन हिल्स येथे सकाळी फिरायला जातात. त्यांना घेण्यासाठी कांतीलाल टाक हा ड्रायव्हर रोज सकाळी घेण्यासाठी येतो. आज नेहमी प्रमाणे कांतीलालने राजा मयूर यांना फोन केला. परंतू त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे कांतीलालने राजा मयूर यांच्या भाऊ भरत मयूर यांना फोन करून सांगितले. त्यानंतर भरत मयूर हे राजा मयूर यांच्या बंगल्यावर आले असता बंगल्याच्या बाहेर सुरक्षा रक्षक बेशुध्दावस्थेत मिळून आले. तर घरात जावून पाहणी केली तर राजा मयूर हे देखल बेशुध्दावस्थेत होते. त्यांनी शैला मयूर यांना बाथरूममधून बाहेर आणले. त्यावेळी शैला मयूर या प्रचंड भयभीत झालेल्या होत्या. त्यांनी सर्व हकीकत भरत मयूर यांना सांगितले. त्यानंतर या घटनेची माहिती पोलीसांनी कळविली. पोलीसांनी घटनास्थळी येवून पाहणी केली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    user
    • Website

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.