Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तरूणाचा बुडून दुदैवी मृत्यू
    क्राईम

    नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तरूणाचा बुडून दुदैवी मृत्यू

    userBy userMay 30, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव प्रतिनिधी । गिरणा नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या तरूणाचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. त्याचा मृतदेह पाण्यात तरंगतांना आढळून आला. याप्रकरणी मेहुणबारे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ओम विजय चव्हाण वय १८ रा. हिसवड ता. मालेगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड गावाजवळ उपखेड आश्रम शाळेत ओम चव्हाण हा तरूण वास्तव्याला होता. दरम्यान आश्रम शाळेच्याजवळ गिरणा नदी पात्र आहे. मंगळवारी २८ मे रोजी दुपारी ४.३० वाजता ओम चव्हाण हा पोहण्यासाठी गिरणा नदी पात्रात गेला होता. त्यानंतर त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. त्याचे शोधकार्य सुरू असतांना बुधवारी २९ मे रोजी पहाटे ४ वाजता त्याचा मृतदेह वरखेड गिरणा नदी पात्रात तरंगतांना आढळून आला. या घटनेबाबत पोलीसात नोंद करण्यात आली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    user
    • Website

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.