Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चहा विक्रेत्या महिलेला दोघांकडून मारहाण
    क्राईम

    चहा विक्रेत्या महिलेला दोघांकडून मारहाण

    userBy userMay 30, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । चहा व सिगरेटचे पैसे मागितल्याच्या रागातून चहाविक्रेत्या महिलेला दोन जणांनी लोटगाडी उलटी करून नुकसान करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना एमआयडीसीतील वैष्णिवी पॉलीमर कंपनीजवळ बुधवारी २९ मे रोजी मध्यरात्री १२.३० वाजता घडली. याप्रकरणी पहाटे ३ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    एमआयडीसीतील व्ही सेक्टरमधील वैष्णिवी पॉलीमर कंपनीजवळ सारीका राजेश वसाणे वय-४० या महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. चहा टपरी चालवून त्या आपला उदरनिर्वाह करतात. कंपनीच्या समोरच त्यांची चहाची टपरी आहे. बुधवारी २९ मे रोजी रात्री १२.३० वाजता महिला ही टपरीवर असतांना करण पाटील आणि चेतन माळी यांनी महिलेच्या टपरीवर येवून चहा व सिगरेट घेतली. त्यानंतर महिलेने चहा व सिगरेटचे पैसे मागितले. या कारणावरून करण पाटील आणि चेतन माळी यांनी महिलेला शिवीगाळ करत चहाची टपरी उलटी करून नुकसान केले. तसेच लाकडी दांडक्याने डोक्यावर मारहाण करून दुखापत केली. याप्रकरणी महिलेने पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार पहाटे ३ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात मारहाण करणारे करण पाटील आणि चेतन माळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाटील हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    user
    • Website

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.