Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ब्रेकिंग : टायर फुटल्याने मुफ्ती हारून नदवी यांच्या कारचा अपघात
    क्राईम

    ब्रेकिंग : टायर फुटल्याने मुफ्ती हारून नदवी यांच्या कारचा अपघात

    userBy userMay 27, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी ।

    खाटीक बिरदारीचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती हारून नदवी यांच्या कारचे टायर फुटल्याने कारचा अपघात झाल्याची घटना सोमवार 27 मे रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील पाळधी गावाजवळ घडली आहे. या अपघातात कारचालक आणि एक मुलगी जखमी झाली असून मुफ्ती हारून नवी व त्यांची पत्नी हे किरकोळ जखमी झाले आहे.

    खाटीक बिरादरीचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती हारून नदवी हे आपल्या परिवारासह मुंबई येथे गेले होते. दरम्यान ते मुंबईवरून जळगावकडे येत असताना सोमवारी 27 मे रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील पाळधी गावाजवळ त्यांच्या कारचे टायर फुटले. त्यामुळे कारचा अपघात झाला. या अपघातात कारचालक व मुलगी हे जखमी झाले असून मुफ्ती हारून नदवी व त्यांची पत्नी हे किरकोळ जखमी झाले आहे. ही घटना घडल्यानंतर पाळधी गावातील ग्रामस्थांनी धाव घेऊन त्यांना तातडीने उपचारासाठी वाहनातून रवाना केले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर खाटीक बिरादरीचे सदस्य व नातेवाईकांनी रुग्णालयात एकच गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. या घटनेबाबत अद्याप पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    user
    • Website

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.