Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धावत्या रेल्वेतून पडल्याने परप्रांतीय तरुणाचा मृत्यू
    क्राईम

    धावत्या रेल्वेतून पडल्याने परप्रांतीय तरुणाचा मृत्यू

    userBy userMay 26, 2024Updated:May 26, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव- प्रतिनिधी ।

    जळगाव ते भादली दरम्यान धावत्या रेल्वेतून पडल्याने एका परप्रांतीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी २६ मे रोजी मध्यरात्री २ वाजेच्या  सुमारास घडली आहे. या प्रकारणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. इर्शाद मेहबूब वय 30 रा. बाबुली  जि. पानिपत राज्य हरियाणा असे मयत झालेल्या परप्रांतीय तरुणाचे नाव आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव ते भादली अप लाईनवरील रेल्वे खंबा क्रमांक 424 च्या 14 आणि 15 दरम्यान एका धावत्या रेल्वेतून परप्रांतीय तरुण इर्शाद मेहबूब हा खाली पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी २६ मे रोजी मध्यरात्री २ वाजेच्या  सुमारास घडली. या घटनेची माहिती जळगाव रेल्वे स्टेशन प्रबंधक यांनी जळगाव तालुका पोलिसांना कळविली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. त्याच्याजवळ असलेल्या कागदपत्राच्या आधारे त्याची ओळख पटली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल फेगडे व पोलीस नाईक नरेंद्र पाटील करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    user
    • Website

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.