Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पोलीस स्थानकात तरुणाने घातला गोंधळ : गुन्हा दाखल
    क्राईम

    पोलीस स्थानकात तरुणाने घातला गोंधळ : गुन्हा दाखल

    editor deskBy editor deskMay 15, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव मिरर | १५ मे २०२४

    तक्रार देण्यासाठी आलेल्या दिनेश दिलीप मांडोळे याने पोलिस ठाण्यात गळफास घेण्याची धमकी देत पोलिसांसोबत वाद घातला. तसेच रात्रीच्या सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालयात जावून त्याने अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला पेटवून देण्याची धमकी देत शांततेचा भंग केल्याची घटना घडली होती. सोमवार दि. १४ रोजी पुन्हा मांडोळे याने पोलिसांच्या अंगावर धावून जात त्याने शिवीगाळ केली. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील वाल्मिक नगरातील दिनेश दिलीप मांडोळे हा तरुण दि. १३ मे रोजी शनिपेठ पोलीस ठाण्यात आला. यावेळी त्याचया बरगळीजवळ जखम झालेली असल्याने त्यातून रक्तस्त्राव होत असल्याने त्याची आई आशाबाई मांडोळे व भाऊ ऋषी मांडोळे हे त्याला घेवून आले होते. पोलिसांनी त्याला काही विचारण्याच्या अगोदरच त्याने आरडाओरड करीत पोलिससोबत अरेररवीची भाषा करु लागला. दरम्यान, त्याची चौकशी केल्यानंतर त्याने आपल्या आत्याच्या मुलाने चॉपर मारला असून त्याला आताच्या आता अटक करा. नाहीतर मी इथच पोलीस स्टेशनमध्ये फॅनला लटकून आत्महत्या करतो, नाही तर पेट्रोल घेवून एस. पी. जातो नाही तर कोणाचा तरी मर्डर करतो अशी धमकी तो पोलिसांना देवू लागला. त्याने रक्ताने माखलेला शर्ट काढून तो ठाणे अंमलदाराच्या टेबलावर आपटला. तसेच तक्रार दाखल करीत असतांना आधी आरोपीला अटक करुन पोलिस ठाण्यात आणा, तेव्हाच मी तक्रार देईल असे तो म्हणू लागला.

    वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर दिनेश मांडोळे हा पोलिसात तक्रार देण्यासाठी आला. याठिकाणी त्याचा भाऊ हेमंत हा पोलीस ठाण्यात येवून तो दिनेशला घरी घेवून जात होता. यावेळी पोलिसांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र तो तेथून निघून गेला. त्यानंतर दिनेश मांडोळे याने पोलीस अधीक्षक कार्यालयात पेट्रोल घेवून जात गोंधळ घातला. यामुळे पोलीस अधीक्षक कार्यालयात चांगलाच गोंधळ उडाल्याचे दिसून आले. मांडोळे याने सांगितल्याप्रमाणे पोलिस त्याचा आतेभाऊ मयूर संजय चांदेलकर याच्या समर्थ कॉलनीतील घरी गेले. परंतु तो घरी नसल्याने पोलिसांना माघारी परतावे लागले तसेच समर्थ कॉलनीत देखील मांडोळे याने गोंधळ घालीत त्याच्या मामांना शिवीगाळ करु लागला. याप्रकरणी पोलीस कर्मचारी प्रशांत देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दिनेश दिलीप मांडोळे याच्याविरुद्ध शासकीया कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गर्दी पाहून थांबला अन् वडिलांचाच अपघात दिसला

    April 28, 2026

    दारू पिऊन धिंगाणा घालणे पडले महागात : २५ जणांवर गुन्हा दाखल !

    April 28, 2026

    भरधाव ट्रकचा कहर : मानराज पार्क चौफुलीवर २५ वर्षीय तरुण ठार, महामार्ग सुरक्षा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

    April 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.