Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात माजी जि.प. सदस्यांच्या घरावर दगडफेक
    क्राईम

    जळगावात माजी जि.प. सदस्यांच्या घरावर दगडफेक

    editor deskBy editor deskMay 11, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहराजवळ असलेल्या मोहाडी येथे अक्षयतृतीयेनिमित्त पत्ते खेळताना दोन जणांमध्ये वाद झाले होते. या दोघांमध्ये मोहाडी रोडवरील जगवानी पेट्रोल पंपाजवळ दोन्ही गटांमध्ये समझोता सुरु होता. परंतु, तेथे त्यांच्यामध्ये पुन्हा वाद उफाळून आल्याने काहिंनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. यामुळे शेजारीच राहणाऱ्या माजी जि.प. सदस्यांच्या घरावरही दगडफेक झाली. यात त्यांच्या घराच्या खिडकीच्या काचा फुटल्या असून त्यांच्या वाहनाचीही तोडफोड करण्यात आली आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, जळगाव शहरापासून जवळ असलेल्या मोहाडी गावात अक्षयतृतीयनिमित्त पत्यांचा डाव सुरू होता. यामध्ये पत्ते खेळत असताना एकासोबत वाद झाल्याने त्याला मारहाण करण्यात आली. त्यामुळे तो व्यक्ती एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला होता, परंतु त्यांनी तक्रार दिलीच नाही. तेथून तो परत मोहाडी गावात येण्यासाठी निघाला होता. दरम्यान, मोहाडी रोडवरील इम्पेरियल अपार्टमेंट जवळील जगवानी पेट्रोल पंपासमोर दुपारच्या वादातून दोन गट एकमेकांना भिडले. या दोन गटातील हा वाद जास्त वाढल्याने काही तरुणांनी दगडफेक केली.

    ही घटना शुक्रवारी १० मे रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. या वेळी संतप्त झालेल्या दोन्ही गटातील व्यक्तींनी एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यास सुरूवात केली. या दगडफेकीमध्ये रस्त्यावर उभी असलेल्या एका चारचाकी वाहनाचे नुकसान झाले आहे. दरम्यान, यात माजी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे यांच्या घरावर ही दगडफेक झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या घराच्या गॅलरी आणि खिडकीचे काचा फुटल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या घरातील लहान मुले व महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
    या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.कॉ. नाना तायडे व एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी या परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. शेवटचे वृत्त हाती आले, तेव्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान या घटनेमुळे जळगाव शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गर्दी पाहून थांबला अन् वडिलांचाच अपघात दिसला

    April 28, 2026

    दारू पिऊन धिंगाणा घालणे पडले महागात : २५ जणांवर गुन्हा दाखल !

    April 28, 2026

    भरधाव ट्रकचा कहर : मानराज पार्क चौफुलीवर २५ वर्षीय तरुण ठार, महामार्ग सुरक्षा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

    April 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.