Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मिनीट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार
    क्राईम

    मिनीट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

    editor deskBy editor deskMay 10, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रावेर : प्रतिनिधी

    अक्षय्य तृतीयेनिमित्त येथे आईसोबत आलेल्या फेकरी येथील तरुणाचे अपघाती निधन झाले. ही घटना पातोंडी गावाच्या पुढे मुक्ताईनगर रस्त्यावर एका ढाब्यासमोर गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान घटना घडली.

    सविस्तर वृत्त असे कि, रावेर तालुक्यातील बक्षीपूर येथील जि. प. प्राथमिक शाळेतील शिक्षक म्हणून सेवारत असलेल्या रामचंद्र मधुकर सोनवणे (रा. रावेर) यांचेकडे त्यांचा भाचा यश दिलीप तायडे (वय २१, रा. फेकरी, ता भुसावळ) हा त्याची आई अलका दिलीप तायडे यांच्यासह मोटारसायकलने अक्षय्य तृतीयेनिमित्त आला होता.

    मामांकडे दुपारी सहभोजन घेतल्यानंतर तो सावदा येथील मावशीला भेटून येतो असे सांगत मोटारसायकलने निघाला. मात्र तो नांदूपिंप्री येथील मावशीकडे जायला निघाला. तो पातोंडी गावाच्या पुढे मुक्ताईनगर रोडने जात असताना मुक्ताईनगरकडून भरधाव वेगात येणाऱ्या एका मिनीट्रकने त्याला समोरून जबर धडक देत उडवल्याने यश हा जागीच ठार झाला. याबाबत रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार प्रिया वसावे पुढील तपास करीत आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गर्दी पाहून थांबला अन् वडिलांचाच अपघात दिसला

    April 28, 2026

    दारू पिऊन धिंगाणा घालणे पडले महागात : २५ जणांवर गुन्हा दाखल !

    April 28, 2026

    भरधाव ट्रकचा कहर : मानराज पार्क चौफुलीवर २५ वर्षीय तरुण ठार, महामार्ग सुरक्षा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

    April 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.