Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » घरफोडी प्रकरणी दोन संशयित ताब्यात
    क्राईम

    घरफोडी प्रकरणी दोन संशयित ताब्यात

    editor deskBy editor deskMay 3, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल : प्रतिनिधी

    तालुक्यातील वढोदा येथील एका घरात झालेल्या दोन लाख रुपयांहून अधिकच्या घरफोडी प्रकरणी दोन परप्रांतीय संशयितांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, वढोदा येथे राहणारे प्रदीप दिनकर सपकाळे यांच्या घरात ८ ते २९ एप्रिल रोजीच्या दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास सपकाळे कुटुंब हे घराच्या छतावर झोपलेले असतांना अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून एक लाख पन्नास हजार रुपये व दागिन्यांसह मोबाइल असा एकूण दोन लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता.

    शोधकामी यावलचे पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे, पोलिस उपनिरीक्षक मुजफ्फर खान पठाण व स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकों किरण धनगर यांच्यासह पोलिसांच्या पथकाने संशयित आरोपी रेवलसिंग उर्फ सावन गुलसिंग बारेला (वय २८, रा. जामन्या, ता. भगवानपुरा, जि. खरगोन) (ह. मु. अडावद ता. चोपडा) व मेगलासिंग उर्फ सेवकराम दलसिंग सोलंकी (वय ३०, राहणार बोकरान्या ता. भगवानपुरा) या दोघांना अडावद येथून ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यात आणखी काही आरोपींचा सहभाग आहे का? याचा शोध घेतला जात आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जेवणासाठी उतरले… अन् एसटी बस पेटली : ५० प्रवासी थोडक्यात बचावले

    March 11, 2026

    दक्षता पेट्रोलपंप घोटाळा : उपनिरीक्षक वाघांकडून मुलाच्या खात्यात 10 लाख; सोन्याची खरेदी उघड

    March 11, 2026

    चार वर्षीय चिमुकलीवर मामाने केला अत्याचार : संतप्त जमावाने रोखला महामार्ग !

    March 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.