Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » एमआयडीसी पोलिसांची कारवाई : सात आरोपींना अटक
    क्राईम

    एमआयडीसी पोलिसांची कारवाई : सात आरोपींना अटक

    editor deskBy editor deskMay 1, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यावेळी हद्दपार, चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्यांसह वॉरंट असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक करण्यात आली. तर नाकाबंदीदरम्यान, १३ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.

    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार गुन्हे शोध पथकाकडून ऑपरेशन राबवून दोन वर्षांसाठी हद्दपार असलेला उदय रमेश मोची (रा. रामेश्वर कॉलनी) याला अटक केली. घरफोडीच्या उद्देशाने फिरत असलेला राहुल जीवन पांडे (रा. सुप्रीम कॉलनी) यालाही ताब्यात घेतले. दोन वर्षांपासून फरार असलेल्या अजय बिरजू गारुंगे (रा. तांबापुरा) होता. त्याला तांबापुरातून अटक केली. याशिवाय भोला राकेश बांगडे (रा. सुप्रीम कॉलनी), विशाल भागवत सुरवाडे, गोलू ऊर्फ राजकिसन मानसिंग परदेशी, आबा मधुकर पाटील (तिघे रा रायपूर, कुसुंबा) यांच्याविरुद्ध न्यायालयाकडील अजामीन पात्र वॉरंट होते. त्यांना ताब्यात घेतले. यासह रेकॉर्डवरील १३ हिस्ट्री शिटरांची तपासणी करण्यात आली. १३ वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ९०० रुपयांचा दंड वसूल केला. सपोनि आसाराम मनोरे, पोलिस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे, दत्तात्रय पोटे, संजयसिंग पाटील, अतुल वंजारी, अनिल तायडे, मंगेश बागुल, दिनेश चौधरी, संदीप सपकाळे, सचिन पाटील, योगेश बारी, चेतन सोनवणे, सिद्धेश्वर डापकर, चंद्रकांत पाटील, गणेश वंजारी यांनी कारवाई केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    क्रेडिट कार्ड थकबाकीवरून पुण्यात भररस्त्यात मारहाण; रिकव्हरी एजंट की गुंड? संतापाची लाट

    April 28, 2026

    गर्दी पाहून थांबला अन् वडिलांचाच अपघात दिसला

    April 28, 2026

    दारू पिऊन धिंगाणा घालणे पडले महागात : २५ जणांवर गुन्हा दाखल !

    April 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.