Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
    क्राईम

    रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

    editor deskBy editor deskApril 26, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील भादली रेल्वे स्थानकाजवळ एका धावत्या रेल्वेने दिलेल्या धडकेत एका ३५ वर्षीय अनोळखी तरूणाचा मृत्यू झाला. गुरुवारी २५ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास आढळून आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील भादली रेल्वेस्थानकाजवळील रेल्वे खंबा क्रमांक ४१६ जवळ एका धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने अनोळखी ३५ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुरूवारी २५ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आले आहे. मयत झालेल्या तरूणाची ओळख पटलेली नाही. त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत चेंदामेंदा झाल्यामुळे तसेच, कपड्यांमध्ये कुठलेही कागदपत्र आढळून आलेले नाही. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला आहे.

    याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांचे मार्गदर्शनाखाली पोकॉ प्रवीण लोहार हे तपास करीत आहेत. मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन नशिराबाद पोलिसांनी केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    क्रेडिट कार्ड थकबाकीवरून पुण्यात भररस्त्यात मारहाण; रिकव्हरी एजंट की गुंड? संतापाची लाट

    April 28, 2026

    गर्दी पाहून थांबला अन् वडिलांचाच अपघात दिसला

    April 28, 2026

    दारू पिऊन धिंगाणा घालणे पडले महागात : २५ जणांवर गुन्हा दाखल !

    April 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.