Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात आढळला कुजलेला मृतदेह
    क्राईम

    जळगावात आढळला कुजलेला मृतदेह

    editor deskBy editor deskApril 24, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात एकटीच वास्तव्यास असलेल्या सत्तर वर्षीय वृद्धेचा घरातच मृत्यु ओढवून कुजलेला मृतदेह सापडला. कुजलेल्या मृतदेहाची दुर्गंधी सुटल्यानंतर सोमवार दि. २३ रोजी दुपारच्या सुमारास या घटनेचा उलगडा झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी शेजारच्यांच्या मदतीने मृतदेह जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल केला.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सुप्रीम कॉलनीत अन्जुमनबी बिस्मील्ला खाटिक (वय-७०) या खुबा नगर जवळील मशीदी शेजारी वास्तव्यास होत्या. त्यांचा मुलगा सलीम बिस्मील्ला हा व्यवायानिमीत्त मुंबईत स्थायीक झाला असून पती बिस्मील्ला खाटिक यांचे निधन झाल्यानंतर अन्जुमनबी या एकट्याच राहत होत्या. कोणाकडूनही मिळालेल्या आर्थिक मदतीवर त्या स्वतःचा उदनिर्वाह करीत होत्या. मधुमेह, ब्लडप्रेशर सह इतर आजार जडल्याने औषधोपचारही सुरु होते. साधारण गेल्या आठवड्यात अन्जमन बी यांना शेजारच्यांनी घराबाहेर पाहिले होते. त्यानंतर त्या कुणालाही दिसल्या नाही. सोमवारी सकाळ पासुनच घरा जवळ दुर्गंधी येत असल्याने शेजारच्यांनी त्यांच्या घरात डोकावुन पाहिले. यावेळी त्यांना अन्जुमनबी यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसून आला.

    त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर एमआयडीस पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने कुजलेला मृतदेहाचा पंचनामा करुन जिल्हारुग्णालयात दाखल करण्यात आला. संध्याकाळी शवविच्छेदन करण्यात येवुन मयत अन्जुमन बी यांच्या भावंडाना मृतदेह सोपवण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    क्रेडिट कार्ड थकबाकीवरून पुण्यात भररस्त्यात मारहाण; रिकव्हरी एजंट की गुंड? संतापाची लाट

    April 28, 2026

    गर्दी पाहून थांबला अन् वडिलांचाच अपघात दिसला

    April 28, 2026

    दारू पिऊन धिंगाणा घालणे पडले महागात : २५ जणांवर गुन्हा दाखल !

    April 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.