Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरदिवसा जळगावात तरुणाचा खून : परिसरात खळबळ
    क्राईम

    भरदिवसा जळगावात तरुणाचा खून : परिसरात खळबळ

    editor deskBy editor deskApril 21, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    काही दिवसांपूर्वीच असोदा शिवारात तरुणाचा खून झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा जळगाव खुनाच्या घटनेने हादरले आहे. आव्हाणे रस्त्यावर असलेल्या लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर यांच्या जिनिंग मागील शेतात एका व्यक्तीची निर्घृणपणे हत्त्या करण्यात आल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, आव्हाणे रस्त्यावर लक्ष्मण पाटील उर्फ लकी अण्णा यांच्या मालकीची लक्ष्मी जीनिंग आहे. त्याच जिनींगमध्ये ठेकेदारीत काम करणाऱ्या एका तरुणाचा शनिवारी पहाटेच्या सुमारास जिनींग मागील भरत खडके यांच्या मालकीच्या शेतात अज्ञात व्यक्तीने खून केल्याचे दुपारच्या सुमारास उघडकीस आले. शेतात चारा कुट्टी पसरलेल्या प्लास्टिक फटवर डोक्यावर मागील बाजूस तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याचा खून करण्यात आला आहे.

    यावेळी घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजनपाटील, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश शर्मा, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत अहिरे, श्वान पथक, ठसे तज्ञ आणि कर्मचारी पोहचले आहेत. मयताचे नाव सुरेश परमसिंग सोलंकी ( ४०) रा.गेहिज खेमला, जि.सेंधावा, मध्यप्रदेश असे असून मृताजवळ काही वस्तू आढळून आल्या असून याबाबत तपास सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. सोबतच पोलीस परिसरातील सीसीटिव्ही च्या माध्यमातून फुटेज, श्वान पथकाने दाखवलेला मार्ग आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    क्रेडिट कार्ड थकबाकीवरून पुण्यात भररस्त्यात मारहाण; रिकव्हरी एजंट की गुंड? संतापाची लाट

    April 28, 2026

    गर्दी पाहून थांबला अन् वडिलांचाच अपघात दिसला

    April 28, 2026

    दारू पिऊन धिंगाणा घालणे पडले महागात : २५ जणांवर गुन्हा दाखल !

    April 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.