Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धावत्या लोकलमध्ये महिलेचा विनयभंग
    क्राईम

    धावत्या लोकलमध्ये महिलेचा विनयभंग

    editor deskBy editor deskApril 10, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक शहरात महिलेसह तरुणीसोबत विनयभंगांच्या घटना घडत असतांना नुकतेच मुंबई शहरातील धावत्या लोकलमध्ये महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी २८ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. रेल्वेत महिलेची छेड काढल्याप्रकरणी श्रावणकुमार विश्वकर्मा नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ही घटना ८ एप्रिल रोजी घडली आहे. जनरल डब्यात आरोपीने पीडित महिलेची छेड काढली होती.

    सविस्तर वृत्त असे कि, धावत्या लोकल ट्रेनच्या खचाखच भरलेल्या जनरल डब्यात सोमवारी रात्री एका २८ वर्षीय पुरुषाने एका महिला प्रवाशाची छे़ड काढल्याप्रकरणी अटक करण्यात आली. २५ वर्षीय पीडित महिला ऑफिसमधून तिच्या एका पुरुष सहकाऱ्यासोबत प्रवास करत होती. रात्री आठच्या सुमारास वांद्रे आणि खार स्थानकांदरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी सांगितलं की, आरोपी श्रावणकुमार विश्वकर्मा हा गोरेगावकडे जाणाऱ्या स्लो लोकल ट्रेनमध्ये वांद्रे येथे चढला होता.

    तो पीडित महिलेच्या जवळच्या पॅसेजमध्ये उभा राहिला. तिला अयोग्यरित्या स्पर्श करू लागला. महिलेने आरडाओरडा केल्यानंतर तिच्या तिच्या सहकाऱ्याने सहप्रवाशांसह त्याला पकडले. त्याला जीआरपीच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपी मूळचा जोगेश्वरीचा रहिवाशी असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे ट्रेनमधील प्रवाशांमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. लैंगिक छळाच्या आरोपाखाली आरोपीवर आयपीसी कलम 354 (ए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मराठा आरक्षणात सहा महिन्यांचा दिरंगाई; फक्त ९८ जणांना मिळाले प्रमाणपत्र !

    February 24, 2026

    आदित्य ठाकरेंनी अधिवेशनात सरकारला धरले धारेवर, लाडकी बहीण, प्रदूषण आणि भ्रष्टाचाराचे प्रश्न!

    February 24, 2026

    “अजित पवारांचा अपघात अपघात नाही? रोहित पवारांचा VSR–DGCAवर धक्कादायक आरोप!”

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.