जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावातील २० वर्षीय तरुणीचे अपहरण करून छायाचित्रे व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पहूर पोलिसांत चारजणांना विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यामध्ये सीमा सुरक्षा बल (बीएसएफ) मधील एका जवानाचाही समावेश आहे.
सविस्तर वृत्त असे कि, वीस वर्षीय तरुणीचे मार्च २३ ते १८ ऑक्टोबर २०२३ दरम्यान अपहरण करण्यात आले. तिला छायाचित्रे व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केल्याची घटना सहा महिन्यांनंतर उघडकीस आली आहे. याप्रकरणात स्वतः तरुणी समोर आल्याने हा प्रकार पोलिसांसमोर आला. मंगला कर उर्फ सुदाम संभाजी कोळी (३०) राहुल सुनील चौधरी सतीश रघुनाथ नाईक उर्फ चव्हाण (२८) व गणेश सोनवणे हे आरोपी आहेत या पैकी या तिघांनी मुलीला बऱ्हाणपूर येथे नेले. छायाचित्रे आणि व्हिडीयो व्हायरल करण्याची धमकी दिली, अशी तक्रार आहे.


