धरणगाव : प्रतिनिधी
तांब्याची तार चोरल्याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी गोरगावले (ता. चोपडा) येथील एकाला अटक केली असून, त्याच्यावर अमळनेर व चोपडा येथे गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आले.
मिळालेल्या माहितीनुसार, तांब्याची तार चोरल्याप्रकरणी पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शोध सुरु असताना धरणगाव पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून संशयित आरोपी प्रशांत जगन वार्डे (२९) याला पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून ४.५ किलो तांब्याची तार हस्तगत केली आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, त्यावर चोपडा तसेच अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. हा आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. आरोपीचा शोध घेण्याकामी पोकॉ प्रवीण पाटील, चंदन पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली



