Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावातील हॉस्पिटलचा अजब प्रताप : रुग्णाकडून उकळले सव्वाआठ लाख
    क्राईम

    जळगावातील हॉस्पिटलचा अजब प्रताप : रुग्णाकडून उकळले सव्वाआठ लाख

    editor deskBy editor deskApril 3, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील सोनवद येथे राहणाऱ्या 70 वर्षीय वृद्ध महिलेवर हृदयविकाराचा झटका आला होता परंतु न्यूरोलॉजिस्ट स्पेशलिस्ट डॉ. गोपाल घोलप आणि गाजरे हॉस्पिटलचे डॉ. सुनील गाजरे व मॅनेजमेंट यांनी तपासणी अंती मेंदूत ब्लॉकेज असल्याचे सांगून त्यांच्यावर शास्त्रक्रिया करून त्यांची तब्येत अजून खालावली गेली, तसेच त्यांच्याकडून ऑपरेशन साठी ५ लाख ५० हजार रुपये आणि हॉस्पिटलचा चार्ज म्हणून ३ लाख ८५ हजार रुपये रुपये वसूल करून फसवणूक केल्याचा खळबळ जनक प्रकार समोर आला आहे. दरम्यान प वृद्ध महिलेची प्रकृती खालावणाऱ्या डॉक्टर घोलप आणि डॉक्टर गाजरे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणीचे निवेदन वृद्ध महिलेच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक यांना तक्रार केली आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की धरणगाव तालुक्यातील सोनवद येथे राहणारे जितेंद्र आत्माराम जयस्वाल यांच्या आई ललिता आत्माराम जयस्वाल वय ७० यांना ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना जळगाव शहरातील रिंग रोड येथील “अवंतिका हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी नेले असता तेथील डॉक्टर यांनी तपासले असता आईस जोरदार अटॅक आला आहे, असे सांगितले. ललिता जयस्वाल या वृद्ध महिलेला मेंदूचा कोणताही आजार नसताना त्यांच्यावर उपचार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर वृद्ध महिलेला डॉ. गोपाल घोलप न्यूरोलॉजिस्ट स्पेशलिस्ट यांनी तपासणी केली असता त्यांनी मेंदूमध्ये पाच ब्लॉकेज असल्याचे सांगितले. त्यांनीच गाजरे हॉस्पिटल येथे दाखल करण्याचे सांगितले. त्यानंतर रुग्ण वृद्ध महिलेला गाजरे हॉस्पिटल येथे दाखल केले त्या ठिकाणी त्यांच्यावर थातूरमातूर उपचार करण्यात आले. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडण्यास सुरुवात झाली त्यावर डॉक्टर गाजरे यांनी सांगितले की मेंदूचे ऑपरेशन करावे लागेल त्यानंतर पंधरा दिवसानंतर तुमची आई चालायला लागेल असा सल्ला दिला. त्यासाठी साडेपाच लाख रुपये खर्च आणि इतर मेडिकल खर्च करावा लागेल असे देखील त्यांनी सांगितले. मेंदूवर केलेल्या शास्त्रक्रियामुळे वृद्ध महिलेची अधिकच प्रकृती खालावली त्यांच्या अंगावर जखमा झाल्या त्यांना चालता येत नव्हते अशा परिस्थितीत डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला व नातेवाईकांकडून ऑपरेशन साठी ५ लक्ष ५० हजर रुपये आणि ३ लाख ८० हजार रुपयांचे चार्जेस असा रक्कम वसूल केला आहे.

    तरी इतका पैसा खर्च करून देखील माझ्या आईच्या तब्येतीत कुठलीही सुधारणा झाली नाही, अखेर त्यांना शहरातील छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल ते दाखल करण्यात आले त्यामुळे त्यांच्यावर मेंदूवर दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया करण्यात आले. यामध्ये वृद्ध महिलेला चालता- उठता- बसता येत नाही, याला जबाबदार म्हणून डॉ. गोपाल घोलप आणि डॉ. सुनील गाजरे हेच आहे. त्यांच्यावर कडक कारवाई अशी, मागणी तक्रारदार जितेंद्र जयस्वाल यांनी जळगाव येथील जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    क्रेडिट कार्ड थकबाकीवरून पुण्यात भररस्त्यात मारहाण; रिकव्हरी एजंट की गुंड? संतापाची लाट

    April 28, 2026

    गर्दी पाहून थांबला अन् वडिलांचाच अपघात दिसला

    April 28, 2026

    दारू पिऊन धिंगाणा घालणे पडले महागात : २५ जणांवर गुन्हा दाखल !

    April 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.