Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » हद्दपार गुन्हेगार माजवत होता जळगावात दहशत
    क्राईम

    हद्दपार गुन्हेगार माजवत होता जळगावात दहशत

    editor deskBy editor deskMarch 19, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार असलेल्या किरण अनिल बाविस्कर (वय २४, रा. गेंदालाल मिल) हा चॉपर घेऊन दहशत माजवित होता. शहर पोलिसांच्या पथकाने सोमवार दि. १८ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार किरण बाविस्कर याला उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी २ वर्षांसाठी जिल्हा हद्दपार केले आहे. दरम्यान जिल्हातून हद्दपार असताना देखील तो शहरात येऊन हातात लोखंडी चॉपर घेवून दहशत माजवित असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना मिळाली.

    त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने सोमवार दि. १८ मार्च रोजी दुपारच्या सुमारास गेंदालाल मिल परिसरात कारवाई करत संशयित आरोपी किरण अनिल बाविस्कर याला अटक केली. त्याच्याकडून लोखंडी चॉपर हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमोल ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बशीर तडवी, पोलीस हेडकॉन्स्टेबल भास्कर ठाकरे, पोलीस नाईक योगेश पाटील, रतन गीते यांच्या पथकाने केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    क्रेडिट कार्ड थकबाकीवरून पुण्यात भररस्त्यात मारहाण; रिकव्हरी एजंट की गुंड? संतापाची लाट

    April 28, 2026

    गर्दी पाहून थांबला अन् वडिलांचाच अपघात दिसला

    April 28, 2026

    दारू पिऊन धिंगाणा घालणे पडले महागात : २५ जणांवर गुन्हा दाखल !

    April 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.