Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तर.. पुन्हा जळगाव लोकसभा मतदारसंघात उमेदवारीची बदल करू शकते भाजपा; जिल्ह्यातील दोन बडे नेते लावता येत जोर..!
    जळगाव

    तर.. पुन्हा जळगाव लोकसभा मतदारसंघात उमेदवारीची बदल करू शकते भाजपा; जिल्ह्यातील दोन बडे नेते लावता येत जोर..!

    editor deskBy editor deskMarch 15, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्युज विजय पाटील संपादक

    लोकसभा निवडणुकीत जळगाव लोकसभा मतदारसंघात मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र दोन दिवस अगोदर त्यांची उमेदवारी रद्द करत खासदार उन्मेष पाटील यांना भाजपाने उमेदवारी दिली होती. आणि या निवडणुकीत उन्मेष पाटील मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. आता या निवडणुकीतही जाहीर केलेल्या यादीत स्मिता वाघ यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार लोकसभा उमेदवारीसाठी भाजपाचे जिल्ह्यातील दोन बडे नेते दुसऱ्या नावासाठी आग्रह धरलेला आहे. त्यामुळे पुन्हा स्मिता वाघ यांच्या उमेदवारी बदल मागच्या निवडणुकीप्रमाणे प्रमाणे होण्याची शक्यता आहे.

    जळगाव लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे उमेदवारी रद्द करून त्यांच्या जागी अमळनेरच्या माजी आमदार स्मिता वाघ यांना भाजपाने उमेदवारी जाहीर केली आहे.

    या उमेदवारी जाहीर केल्यामुळे खासदार पाटील यांनी आज माध्यमांत मध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यात पक्षाचे काम करण्याचे त्यांनी सांगितले असून पक्षातीलच कुरघोडींमुळे उमेदवारी मिळाले मिळाले नसल्याची त्यांनी अप्रत्यक्ष जिल्ह्यातील भाजपच्या दोन बड्या नेत्यांवर विधान करून आरोप केले आहे.

    स्मिता वाघांची पुन्हा रद्द होऊ शकते उमेदवारी?
    2019 च्या लोकसभा निवडणुकीत स्मिता वाघ यांची उमेदवारी भाजपने जाहीर केली होती. मात्र पुन्हा राजकीय गणित बदलत भाजपने अचानक खासदार उमेश पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या होत्या.
    तर भाजपच्या प्रचाराच्या कार्यक्रमातच फ्रीस्टाइल देखील झाली होती. त्यानंतरही भाजपच्या उमेदवार निवडणुकीत चांगल्या मतांनी खासदार पाटील विजयी झाले होते. आता देखील स्मिता वाघ यांची उमेदवारी भाजपने जाहीर केली असली तरी जिल्ह्यातील दोन बडे नेते दुसऱ्या नावासाठी आग्रही होते आणि अजूनही आहे. त्यामुळे पुन्हा वाघ यांची उमेदवारी कापली जाते का ? अशी देखील शक्यता राजकीय वर्तुळात व विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मराठा आरक्षणात सहा महिन्यांचा दिरंगाई; फक्त ९८ जणांना मिळाले प्रमाणपत्र !

    February 24, 2026

    आदित्य ठाकरेंनी अधिवेशनात सरकारला धरले धारेवर, लाडकी बहीण, प्रदूषण आणि भ्रष्टाचाराचे प्रश्न!

    February 24, 2026

    “अजित पवारांचा अपघात अपघात नाही? रोहित पवारांचा VSR–DGCAवर धक्कादायक आरोप!”

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.