Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » विजय पाटील यांच्या घराची अडीच तास पोलिसांकडून झाडाझडती
    क्राईम

    विजय पाटील यांच्या घराची अडीच तास पोलिसांकडून झाडाझडती

    editor deskBy editor deskMarch 14, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    ॲड.पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांचे अपहरण करून रात्रभर दोरीने हात पाय बांधून ठेवत डांबून ठेवत बंदुकीचा धाक दाखवत जीवे ठार मारण्याची धमकी देत प्रयत्न केल्याप्रकरणी तसेच दांडका चापटा लाथा बुक्यानी मारहाण केल्याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन येथे दिनांक ३-३-२४ रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला होता.

    या अनुषंगाने पोलीस घटनेचा पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी गेल्या असता त्यांना सदर घराला कुलुप आढळून आल्याने पोलीस माघारी परतले होते. यानंतर पोलिसांनी पुन्हा कोर्टात धाव घेत घर धडाधडतीचे परवानगी कोर्टाकडून घेतली व यावेळी आरोपी यांचे बंधू मनोज पाटील हे प्रत्यक्ष हजर होऊन इन CAMERA अडीच तास 20 ते 25 कर्मचाऱ्यांवर संपूर्ण घराची काल दिनांक१३-३-२४ रोजी दुपारी ४:०० ते संध्याकाळी ६:३० वाजेपर्यंत झाडाझडती घेण्यात आली. यावेळी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पदाधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी घटनास्थळी तैनात होते.

    या अडीच तासाच्या झाडाझडती मध्ये मात्र पोलिसांना काहीही घटनास्थळी आढळून आले नाही आरोपींनी गुन्ह्यामध्ये वापरलेल्या सर्व वस्तू या विल्हवट लावली असल्याचे पोलिसांना निदर्शनात आले. आहे. आता जिल्हा पेठ पोलिसांसमोर आरोपींचा शोध घेऊन त्यांच्याकडून त्या हस्तगत करण्याचे मोठे आव्हान आहे पोलीस आरोपींचा आता वेगाने शोध घेत आहे. तसेच विविध पथक देखील रवाना करण्यात आली असल्याची माहिती आहे.

    गुन्हा दाखल झाल्यावर दुसऱ्याच दिवशी दुपारच्या सुमारास आरोपींना याची कान भून लागली होती तसेच फिर्याद देखील प्राप्त झाली असल्याचे आपल्याला समजते यामुळे पोलीस येण्याच्या आत सर्व आरोपी हे फरार होत असताना गुन्ह्यामध्ये वापरलेल्या सर्व वस्तूंची विल्हेवाट लावून पसार झालेले आहेत पोलिसांनी आता तपासाची चक्रे वेगाने फिरवावी व आरोपींना लवकरात लवकर अटक करून सर्व मुद्देमाल हस्तगत करावा.   – ॲड.पियुष नरेंद्रअण्णा पाटील

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    क्रेडिट कार्ड थकबाकीवरून पुण्यात भररस्त्यात मारहाण; रिकव्हरी एजंट की गुंड? संतापाची लाट

    April 28, 2026

    गर्दी पाहून थांबला अन् वडिलांचाच अपघात दिसला

    April 28, 2026

    दारू पिऊन धिंगाणा घालणे पडले महागात : २५ जणांवर गुन्हा दाखल !

    April 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.