Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वाळूमाफियांची मुजोरी : डीवायएसपीच्या खासगी वाहनाला डंपरची धडक
    क्राईम

    वाळूमाफियांची मुजोरी : डीवायएसपीच्या खासगी वाहनाला डंपरची धडक

    editor deskBy editor deskMarch 10, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जिल्ह्यात वाळू माफियांची मुजोरी वाढली आहे. फैजपूरच्या डीवायएसपी अन्नपूर्णा सिंग यांच्या खासगी वाहनाला डंपरची धडक देऊन त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न वाळू माफियांनी केला. ही थरारक घटना शुक्रवारी रात्री ११:३० वाजता हिंगोणा शिवारातील पेट्रोल पंपासमोर घडली. याबाबत तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डंपर चालकास अटक करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, मयूर सुरेश कोळी (३०, रा. डांभुर्णी, ता. यावल), असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. यावल रोडवर अवैध वाळ वाहतक होत असल्याची माहिती अन्नपूर्णा सिंग यांना मिळाली. यानंतर त्यांच्या पथकाने यावलहून फैजपूरकडे जाणाऱ्या वाळू इंपरला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, डंपर भरधाव वेगाने पुढे गेला. यानंतर पोलिस पथकाने या डंपरचा पाठलाग सुरू केला. पोलिस वाहन पुढे निघाले असता डंपर चालकाने पोलिसांच्या वाहनाला मागून धडक दिली. धडक दिल्यानंतर डंपर बाजूला असलेल्या शेतात उलटले.

    पोलिसांनी डंपर चालक मयूर कोळी याला ताब्यात घेतले, तर क्लीनर प्रशांत ऊर्फ दाद परुषोत्तम पाटील (रा. डांभुर्णी, ता. यावल) हा तिथून पळून गेला, तर डंपर मालक ज्ञानेश्वर ऊर्फ नाना नामदेव तायडे (रा. कोळन्हावी) यालाही आरोपी करण्यात आले आहे. पोलिस नाईक अल्ताफ अली यांच्या फिर्यादीवरून वरील तीनही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास डीवायएसपी तथा सहायक पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नीलेश वाघ, फौजदार बबन पाटोळे करीत आहेत. डीवायएसपींच्या पथकात पोलिस नाईक अल्ताफ अली, दिलीप तायडे, गणेश मनोरे, सुमित बाविस्कर यांचा समावेश होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पोलीस–वन विभागात नोकरी लावण्याचे आमिष; चाळीसगावात ६ लाखांची फसवणूक

    February 6, 2026

    किरकोळ वादातून मारहाण ; शुभम सपकाळेचा उपचारादरम्यान मृत्यू

    February 6, 2026

    नांदवेल फाट्याजवळ पोलिस पाटलांचा मृत्यू; अज्ञात वाहनाच्या धडकेची शक्यता

    February 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.