Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धक्कादायक : पोलीस कोठडीतील संशयिताने घेतला गळफास
    अमळनेर

    धक्कादायक : पोलीस कोठडीतील संशयिताने घेतला गळफास

    editor deskBy editor deskMarch 9, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी

    अमळनेर पोलीस ठाण्यात शनिवारी दि. ९ मार्च रोजी सकाळी एका संशयीत आरोपीने पोलीस कोठडीतील शौचालयात गळफास घेत असतांना आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्यासह इतर अधिकारी यांनी धाव घेतली. यामुळे खळबळ उडाली आहे .

    मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील डांगरी येथील रहिवासी असलेल्या संशयीत आरोपी घनश्याम भाऊलाल कुमावत (वय ४९) असे मयताचे नाव आहे. जळगाव जिल्ह्यातील मारवड पो.स्टे.ला दि.२५ फेब्रुवारी २०२४ रोजी चोरीच्या दाखल गुन्ह्यात पोलिसांनी संशयीत आरोपी घनश्याम भाऊलाल कुमावत यास दि.२ मार्च रोजी ९.४१ वाजता अटक केली होती. गुन्ह्यात त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत दि.६ मार्च रोजी संपल्याने त्यास मारवड पोलीस स्टेशन येथील दि.२९ फेब्रुवारी २०२४ रोजी दाखल गुन्ह्यात पोलीस कोठडी घेऊन वर्ग केले होते.

    पोलीस कोठडीत असताना शनिवार दि.९ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास पोलीस लॉकअप अंमळनेर मधील शौचालयात संशयीत आरोपी घनश्याम भाऊलाल कुमावत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटना निदर्शनास येताच पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली असून पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. अमळनेर येथे पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    “अजित पवारांचा अपघात अपघात नाही? रोहित पवारांचा VSR–DGCAवर धक्कादायक आरोप!”

    February 24, 2026

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    लाडकी बहिणींना जानेवारीचा हप्ता; लाखो महिलांच्या खात्यात जमा

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.