Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चोरीच्या उद्देशाने फिरणारे दोघे अटकेत
    क्राईम

    चोरीच्या उद्देशाने फिरणारे दोघे अटकेत

    editor deskBy editor deskFebruary 29, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    रात्रीच्या सुमारास घरफोडी करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोन संशयितांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवार रात्री करण्यात आली असून दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कस्तुरी हॉटेजवळ मंगळवार दि. २७ रोजी रात्रीच्या सुमारास महेश संतोष भोई (वय २०, रा. रामेश्वर कॉलनी) हा चोरी करण्याच्या उद्देशाने फिरताना आढळून आला होता. तसेच मेहरुण स्मशानभूमीजवळ राजेश माणिकराव राठोड (वय २३, तांबापुरा) हा देखील चोरी आणि घरफोडीच्या उद्देशाने चेहरा झाकून संशयास्पदरित्या फिरताना रात्री आढळला होता. या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, सचिन पाटील, विकास सातदिवे, सुधीर साळवे, गणेश शिरसाळे, ललित नारखेडे, आकाश राजपूत, ईश्वर भालेराव यांच्या पथकाने केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पहाटेचा थरार : कारमधून आलेल्या चोरट्यांची धाड; दोन दुकानं फोडून पोलिसांना चकवा !

    April 29, 2026

    मध्यरात्री भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला जोरदार धडक; चालकासह महिला गंभीर !

    April 29, 2026

    पोलिस दलात ‘टाईम शिस्त’ लागू; उशिरा येणाऱ्यांवर धिवरेंचा कडक दणका!

    April 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.