Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खडसेंच्या भाजप प्रवेशावर रक्षा खडसेंचे घुमजाव !
    जळगाव

    खडसेंच्या भाजप प्रवेशावर रक्षा खडसेंचे घुमजाव !

    editor deskBy editor deskFebruary 27, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यापासून अनेक दिग्ग्ज्नानी  भाजपात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपमध्ये येण्याचा प्रयत्न करत असल्याबाबत चर्चा सुरू आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांच्या सून व भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये यावे, असे आवाहन केले होते. मात्र, या आवाहनानंतर रक्षा खडसेंनी आपली भूमिका बदलवत, आपण खडसेंना आवाहन केलेच नसल्याचे सांगत आपल्या वक्तव्यावरून घूमजाव केला आहे.

    आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे राजकारण तापले आहे. मध्यंतरी काँग्रेसचे नेते डॉ.उल्हास पाटील डॉ.केतकी पाटील राष्ट्रवादीचे संजय गरुड यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, एकनाथ खडसे हे देखील घरवापसी करणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यातच भाजपचे नेते विनोद तावडे यांनी खडसेंनी भाजप प्रवेशासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे सांगितले होते. तर गिरीश महाजनांनीही खडसे भाजप प्रवेशासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले होते. काही दिवसांपूर्वी रक्षा खडसेंनी एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये यावे असे आवाहन केले होते. मात्र, सोमवारी सावदा येथे पत्रकारांशी बोलताना, आपण एकनाथ खडसे यांना भाजप प्रवेशासाठी आवाहन केलेच नसल्याचे सांगितले

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026

    वेळ संपल्याने बँड बंद; पुन्हा वाजविण्यास नकार दिल्याने बँडमालकावर हल्ला !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.