Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मराठा आंदोलक आक्रमक : महामंडळाची बस पेटवली
    क्राईम

    मराठा आंदोलक आक्रमक : महामंडळाची बस पेटवली

    editor deskBy editor deskFebruary 26, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जालना : वृत्तसंस्था

    मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मला सलाईनमधून विष देऊन मारण्याचा प्रयत्न झाला असून हे कटकास्थान फडणवीसांचं आहे, असं जरांगे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, जरांगेंच्या आरोपानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. जालन्यातील अंबड तालुक्यात मराठा आंदोलकांनी बस पेटवली आहे.

    या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. दरम्यान, पोलिसांनी अंबड तालुक्यातील वाढता तणाव पाहता संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे या परिसरात आता मराठा आंदोलकांना मनाई असणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे.

    जिल्ह्याधिकाऱ्यांनी अंबड तालुक्यात संचाबंदी लागू करण्याचे आदेश काढले आहेत. या काळात दुकाने, आस्थापने बंद ठेवण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारचे शस्त्र, ज्वलनशील पदार्थ, स्फोटके सोबत बाळगता येणार नाहीत. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील मुंबईला जाण्यास ठाम असून सध्या ते भांबेरी गावात आहेत. त्या ठिकाणी मराठा आंदोलक जमा होत असल्याने पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. पोलिसांनी मनोज जरांगेंच्या कट्टर समर्थकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. शैलेंद्र पवार, बाळासाहेब इंगळे आणि शिवबा संघटनेचे श्रीराम कुरणकर असं ताब्यात घेण्यात आलेल्या जरांगेंच्या सहकाऱ्यांची नावे आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.