Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात १४ लाखांचा गुटखा जप्त
    क्राईम

    जळगावात १४ लाखांचा गुटखा जप्त

    editor deskBy editor deskFebruary 26, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    राज्यात बंदी असलेल्या पानमसाला, सुगंधित तंबाखू गोड सुपारीचा साठा केलेल्या गोदामावर कारवाई करत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने १४ लाख एक हजार ६१२ रुपयांचा साठा जप्त केला, ही कारवाई औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या दोन गोदामांमध्ये करण्यात आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गोदाम मालक हिरालाल उत्तम पाटील (३८, रा. पिंप्राळा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, औद्योगिक वसाहत परिसरातील गोदामात गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखूचा साठा केल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली. त्यानुसार या विभागाचे नाशिकचे सहायक आयुक्त एम. एम. सानप यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार, अमित रासकर, गोपाल कासार, उमेश सूर्यवंशी यांनी औद्योगिक वसाहत परिसरात जाऊन कारवाई केली. यात एच व एम सेक्टरमधील दोन गोदामांची तपासणी केली असता तेथे १४ लाख एक हजार ६१२ रुपये किमतीचा पानमसाला, सुगंधित तंबाखू, स्वीट सुपारी याचा साठा आढळून आला. हा साठा पथकाने ताब्यात घेतला. तपास पोउनि नीलेश गोसावी करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    धरणगाव तालुक्यात क्रूझर उलटून नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू, सहा जखमी

    April 29, 2026

    पहाटेचा थरार : कारमधून आलेल्या चोरट्यांची धाड; दोन दुकानं फोडून पोलिसांना चकवा !

    April 29, 2026

    मध्यरात्री भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला जोरदार धडक; चालकासह महिला गंभीर !

    April 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.