Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जिल्ह्यातील ११ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या
    क्राईम

    जिल्ह्यातील ११ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

    editor deskBy editor deskFebruary 25, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ज्या बदल्या झाल्या नाही, त्या रद्द करण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर जळगाव जिल्ह्यातील ११ पोलिस 7 अधिकाऱ्यांची अन्य जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. यामध्ये तीन पोलिस निरीक्षक, एक सहायक पोलिस निरीक्षक व सात पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश आहे.

    नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी नाशिक परिक्षेत्रातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांची धुळे येथे, ज्ञानेश्वर जाधव यांची नाशिक ग्रामीण व शिल्पा पाटील यांचीही नाशिक ग्रामीण येथे बदली झाली आहे.

    सहाय्यक पोलिस निरीक्षकांमध्ये योगिता नारखेडे यांची नाशिक ग्रामीण येथे बदली झाली आहे. पोलिस उपनिरीक्षकांमध्ये जळगावातील गोपाल देशमुख, रुपाली महाजन, चंद्रकांत पाटील, किशोर पाटील, गंभीर शिंदे यांची नाशिक ग्रामीण येथे, दिपाली पाटील, मसलोद्दीन शेख यांची धुळे बदली झाली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षकांमध्ये जळगाव जिल्ह्यातून एक अधिकारी जाणार असून अहमदनगर येथून महेश येसेकर हे जळगावात येणार आहे. पोलिस उपनिरीक्षकांमध्ये सात जण जिल्ह्यातून जाणार आहे तर सहा जण जिल्ह्यात येणार आहे. यामध्ये नाशिक ग्रामीण येथून विजय गायकवाड, बबन पाटोळे, चंद्रकांत दवंगे, संजय विधाते, धुळे येथून कैलास दामोदर, नंदुरबार येथून प्रिया वसावे जिल्ह्यात येणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खानापूरजवळील लुटीचा उलगडा; ६७ सीसीटीव्ही तपासून पोलिसांची धडाकेबाज कारवाई

    February 25, 2026

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.