Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » १७ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने वार
    क्राईम

    १७ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने वार

    editor deskBy editor deskFebruary 19, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरापासून नजीक असलेल्या आसोदा येथे मित्राची व अन्य दोघांची बोलचाल सुरू असताना, त्या ठिकाणी गेलेल्या निखिल वसंत बिन्हाडे (१७) या तरुणावर धारदार शस्त्राने वार करून जखमी करत मारहाण करण्यात आली. ही घटना तालुक्यातील आसोदा येथे शुक्रवार, १६ फेब्रुवारी रोजी रात्री घडली. या प्रकरणी शनिवार, १७ फेब्रुवारी रोजी तालुका पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    शुक्रवारी रात्री निखिल बिन्हाडे याचा मित्र ऋतिक बिन्हाडे व अन्य दोघांमध्ये बोलचाल सुरू होती. त्यावेळी निखिल तेथे गेला, याचा राग आल्याने दोघांनी त्याला बेदम मारहाण करून कानाजवळ धारदार वस्तू मारत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी निखिल बिन्हाडे याने शनिवारी तालुका ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ. सुधाकर शिंदे करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !

    April 29, 2026

    अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

    April 29, 2026

    फैजपूर-वरणगावमध्ये गोडाऊन फोडून सिलेंडर चोरी करणारी टोळी उघड; लाखोंचा मुद्देमाल जप्त!

    April 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.