Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नॅक समितीची शिक्षणशास्त्र महाविद्यालय अमळनेर येथे भेट
    Uncategorized

    नॅक समितीची शिक्षणशास्त्र महाविद्यालय अमळनेर येथे भेट

    editor deskBy editor deskFebruary 15, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी

    (प्रा. जितेश चव्हाण) नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय अमळनेर येथे राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदेने (National Assessment and Accreditation Council) नुकतीच दिनांक 13 व 14 फेब्रुवारी रोजी येथे भेट देऊन मूल्यांकन केले.
    याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक 13 व 14 फेब्रुवारी रोजी नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय अमळनेर येथे राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदेने (National Assessment and Accreditation Council) समितीचे अध्यक्ष डॉ. अंबिका दत्त शर्मा प्रोफेसर डॉ. हरसिंग गौर विश्वविद्यालय सागर (म.प्र.) समन्वयक डॉ. सुधीर कुमार जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी दिल्ली, सदस्य प्राचार्य डॉ. सर्वनन थर्मलिनग्राम भारतीय कॉलेज ऑफ एज्युकेशन विलुपुरम तामिळनाडू आदी मान्यवरांचे महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापकांना विजयनाना पाटील आर्मी स्कूल चे विद्यार्थी, सुभेदार व कमांडर यांनी स्वागत करून मानवंदना दिली. समितीच्या सदस्यांनी प्राचार्य व नॅक समन्वयक यांच्या सादरीकरणानंतर प्रत्येक कागदपत्रांची कसून तपासणी केली तसेच विविध विभाग, अध्ययन प्रणाली, उपलब्ध सुविधा, संशोधन, प्रशासनाविषयी माहिती घेतली.

    महाविद्यालयात आयोजित सांस्कृतिक, क्रिडा तसेच विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यविषयी माहितीचा आढावा घेतला़. याप्रसंगी नवलभाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड विजय नवल पाटील, प्रशासकीय अधिकारी श्री. डी.बी. पाटील, प्रा. शाम पवार, रुख्मिणीताई कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जे. शेख, कला महाविद्यालय नवनगर येथील प्रा. डॉ. गांगुर्डे उमेश काटे यांनी मार्गदर्शन केले. नॅक समितीचे चेअरमन व सदस्य यांनी विद्यार्थी, माजी विद्याथी, पालक, प्राध्यापकांसह कर्मचारी यांची बैठक घेऊन संवाद साधला. ग्रामीण भागात महाविद्यालयासाठी येणाऱ्या अडचणी, विद्यार्थ्यांच्या समस्यांविषयी मार्गदर्शन केले़ तसेच उपक्रमाविषयी महाविद्यालयाचे कौतुक केले़. दरम्यान महाविद्यालयाला देण्यात आलेल्या ग्रेड विषयी माहिती कळविण्यात येणार असल्याचे नॅकच्या सदस्यांनी सांगितले़. समितीच्या सदस्यांनी मूल्यांकनाचा अहवाल बंद पाकिटात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़. पी.पी.चौधरी, स्टिअरिंग समितीचे समन्वयक डॉ़. नयना वाणी यांच्याकडे सुपूर्द केला.

    महाविद्यालयाच्या मुल्यांकनासाठी चाललेल्या या नॅकच्या प्रक्रियेत मदत करणारे मार्गदर्शक मेंट्रोर प्रा.डॉ.जयेश गुजराती यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील सर्व प्रा. डॉ. एन.के.वाणी, प्रा. डॉ. एन जी. पाचपांडे प्रा.डॉ.ए.के. जोशी, प्रा.डॉ.जे. एन चव्हाण. प्रा. यु. बी. पाटील प्रा. डॉ. एस. सी.तायडे प्रा. के.वा.देवरे यांनी सात criteria यांचा सखोल अभ्यास करून आवश्यक माहिती संकलित करून नॅक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. कार्यालयीन कर्मचारी अनिकेत सूर्यवंशी, किरण रावळ, गिरीश पाटील, राजेंद्र वाघ, विनोद सोनवणे, सोपान पाटील, जितेंद्र पाटील, चेतन थोरात यांनी सहकार्य केले. आर्मी स्कूलचे प्राचार्य प्रभाकर कोळी, सुनील महाले, व्ही.डी.पाटील, अनिल पाटील, शरद पाटील, प्रेमराज सूर्यवंशी, मिलिंद बोरसे, दुर्गेश वैद्य,किरण बाविस्कर यांचेसह औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी व बीएड कॉलेजचे विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राज ठाकरेंना दिला मंत्री सामंतांनी युती बाबत सल्ला !

    October 13, 2025

    जिल्ह्यात खुनाची मालिका संपेना : रात्रीच्या सुमारास तरुणाच्या खुनाने पुन्हा जिल्हा हादरला !

    October 6, 2025

    स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : ऑनलाइन सट्टा खेळणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या !

    September 23, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.