Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सोनसाखळी लांबविणाऱ्या चोरट्याला जळगावात अटक
    क्राईम

    सोनसाखळी लांबविणाऱ्या चोरट्याला जळगावात अटक

    editor deskBy editor deskFebruary 13, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    बुलढाणा जिल्ह्यात सोनसाखळी लांबविणाऱ्या चोरट्याला सोमवारी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलिसांनी सुप्रीम कॉलनी परिसरातून अटक केली आहे. प्रशांत उर्फ चोर बाप्या पंडित साबळे (वय-३१, रा. सुप्रीम कॉलनी जळगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, सुभाषराव खैरे (वय-६५) या वृद्ध महिलेची रविवारी सकाळी ११ वाजता खामगाव शहरात पायी जात असताना दोन चोरट्यांनी दुचाकीवर येऊन त्यांच्या गळ्यातील २० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन धूमस्टाईल लांबवल्याची घटना घडली होती. या संदर्भात खामगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार बुलढाणा पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल नीलसिंग चव्हाण यांच्यासह एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाई करत संशयित आरोपी प्रशांत साबळे याला अटक केली आहे.
    ही सोन्याची चेन लांबविणाऱ्या संशयित आरोपी प्रशांत उर्फ चोर बाप्या पंडित साबळे हा सुप्रीम कॉलनीत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !

    April 29, 2026

    अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

    April 29, 2026

    फैजपूर-वरणगावमध्ये गोडाऊन फोडून सिलेंडर चोरी करणारी टोळी उघड; लाखोंचा मुद्देमाल जप्त!

    April 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.