Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » लोकसभा निवडणुकीचे भाजप शिवसेना जळगाव जिल्ह्यातील रणशिंग फुंकणार ; अमित शाह, आदित्य ठाकरे दौऱ्यावर
    जळगाव

    लोकसभा निवडणुकीचे भाजप शिवसेना जळगाव जिल्ह्यातील रणशिंग फुंकणार ; अमित शाह, आदित्य ठाकरे दौऱ्यावर

    editor deskBy editor deskFebruary 12, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    लोकसभा निवडणुकीच्या लवकरच बिगुल वाजणार असल्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीचे भाजपा व शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून रणशिंग एकाच दिवशी फुंकणार आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची चुरस पहावयास मिळणार आहे.

    निवडणुकीसाठी आतापासूनच जळगाव जिल्ह्यात राजकीय पक्षांकडून मोर्चा बांधणीला सुरुवात झाली आहे. भाजपाचे केंद्रीय मंत्री अमित शहा व शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे 15 रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.

    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव लोकसभा मतदारसंघात आतापासूनच निवडणुकीचे पूर्वतयारीसाठी लगबग सुरू झालेली दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा जळगाव दौरा हा महत्त्वाचा ठरणार आहे. जळगाव येथे क्लस्टर बैठक घेतली जाणार असून याबाबत जामनेर येथे रविवारी बैठक घेण्यात आली.

    ठाकरेंच्या चार सभा
    गुरुवारी आदित्य ठाकरे हेदेखील जळगाव दौऱ्यावर येत आहेत. जळगाव, शिरसोली, कासोदा व भडगाव याठिकाणी सभा घेतील. जळगाव लोकसभा मतदारसंघ हा ठाकरे गटाला मिळाल्याचा दावा संजय सावंत यांनी केला. त्यामुळे आदित्य ठाकरे येथून लोकसभेसाठी रणशिंग फुंकणार असल्याचे बोलले जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    राजकीय वजन वाढवण्याची शिकवण, भावनिक आठवणींचा धगधगता प्रवास ; रोहित पवार !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.