Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चारचाकीच्या धडकेत १४ वर्षीय मुलाचा मृत्यू
    क्राईम

    चारचाकीच्या धडकेत १४ वर्षीय मुलाचा मृत्यू

    editor deskBy editor deskFebruary 9, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वरणगाव : प्रतिनिधी

    शहरातील अक्सा नगर परिसरातील मोकळ्या जागेत लहान मुले खेळत असताना मागून येणाऱ्या चारचाकी गाडीने जोरदार धडक दिल्याने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार दि ८ रोजी सायकाळच्या सुमारास शहरातील अक्सा नगर परिसरातील रहिवाशी असलेला नुमान आशिक बेग ( १४ ) हा घराच्या शेजारीच असलेल्या मोकळ्या पटांगणावर त्याच्या मित्रा सोबत सायकल चालवत असतांना त्याच ठिकाणी चारचाकी मालवाहु (क्र एम एच ०४ इ एल ८३०२ )या गाडीचे दुरुस्तीचे काम सुरू होते. काम झाल्या नंतर गाडी चालवून पाहताना नुमानच्या सायकलीला चारचाकी गाडीने जोरदार धडक दिल्याने तो खाली कोसळल्याने त्याच्या डोक्याला जबर मार लागला . त्याला तात्काळ भुसावळ येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

    नुमान हा इ आठवीत शिककणारा चाटे स्कुलचा विद्यार्थी होता . त्याच्या दुर्दैवी अचानक जाण्यामुळे त्याच्या परिवारावर शोककळा पसरून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . या बाबत वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मोहाडी रोड ते शिरसोली रोड अखेर नव्याने होणार; नगरसेविका वैशाली अमित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

    July 3, 2026

    चोपड्यात जळगाव एलसीबीची मोठी कारवाई; गावठी कट्टा, मॅगझिनसह तीन जण अटकेत, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

    July 3, 2026

    शेतात पेरणी सुरू अन् क्षणात होत्याचं नव्हतं; विजेच्या तडाख्यात २१ वर्षीय तरुण ठार

    June 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.