Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आ.पवारांवर ईडीची कारवाई : धरणगावात तहसीलदारांना निवेदन
    क्राईम

    आ.पवारांवर ईडीची कारवाई : धरणगावात तहसीलदारांना निवेदन

    editor deskBy editor deskFebruary 1, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी

    राज्यातील शरद पवार गटाचे आ.रोहित पवार यांच्यावर गेल्या काही दिवसापासून ईडीची चौकशी सुरु असल्याने राज्यातील राष्ट्रवादीतर्फे या घटनेचा निषेध म्हणून राज्यभर आंदोलन करीत आहे. याचाच एक भाग म्हणून धरणगाव शहरात देखील तहसीलदार यांना निवेदन देवून निषेध करण्यात आला. हे निवेदन तालुकाध्यक्ष धनराज माळी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

    निवेदनात म्हंटले आहे कि, राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व आ.रोहीत पवार हे सतत अन्यायाविरूध्द लढत असल्याने आंदोलनाच्या माध्यमातून नागरीकांच्या प्रश्नावर सतत आवाज उठवून झोपेचे सोंग घेणा-या केंद्रसरकार व महाराष्ट्र राज्य हे ई. डी. ची कार्यवाही व धाक दाखवून विरोधी पक्ष नेत्यांचे खच्चीकरण करीत आहेत. असे करणे त्वरीत थांबवावे.

    तसेच शेतक-यांना आतापर्यंत कोणतेही नुकसान भरपाई, पिक विमा, कापसाला हमी भाव, सोयाविन तुर, कांदा निर्यात बंदी, शैक्षणिक संस्थांचे खाजगीकरण, वाढती बेरोजगारी, पेट्रोल डिझेल व गॅस यांचे वाढलेले भाव या प्रश्नांबद्दल सर्वसामान्य जनता त्रस्त झालेली असून या प्रश्नांकडे लक्ष न देता जनतेच्या प्रश्नांवावत आवाज उठवणा-या विरोधी पक्ष नेत्यांचा आवाज दावण्याचा पयल सरकार करीत आहे. वरील सर्व बाबींचा विचार करून जनतेचा आवाज दावण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल याची नोंद घ्यावी.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भुसावळात शस्त्रसाठा उघड; तरुणाच्या अटकेने सुरक्षा प्रश्न ऐरणीवर

    May 3, 2026

    शॉर्टसर्किटचा कहर; चटई कंपनीपासून तीन कंपन्यांपर्यंत आगीचा फैलाव

    May 3, 2026

    हळदीच्या कार्यक्रमाहून परतताना अपघात, तरुण ठार तर एक जखमी !

    May 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.