Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » २२ गुन्हे दाखल असलेल्या ‘पिण्या’अटकेत
    क्राईम

    २२ गुन्हे दाखल असलेल्या ‘पिण्या’अटकेत

    editor deskBy editor deskJanuary 30, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    दोन वर्षांसाठी हद्दपार असताना तलवार घेऊन दहशत पसरविणाऱ्या व २२ गंभीर गुन्हे दाखल असलेला दिनकर ऊर्फ पिण्या रोहिदास चव्हाण (वय २६, रा. सुप्रीम कॉलनी) याला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेत तलवार जप्त केली, पिण्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दिनकर ऊर्फ पिण्या रोहिदास चव्हाण याच्यावर दोन वर्षांसाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. तो हद्दपार असताना सुप्रीम कॉलनी परिसरात तलवार घेऊन दहशत पसरवीत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यांनी गुन्हे शोध पथकातील पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, राहुल रगडे, सचिन पाटील, विशाल कोळी, सतीश गरजे, मंदार पाटील यांना कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने दिनकर जवळून तलवार जप्त करीत त्याला ताब्यात घेतले व त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला न्यायमूर्ती जे, एस. केळकर यांच्या न्यायालयात हजर केले असता, त्याची कारागृहात रवानगी केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मोहाडी रोड ते शिरसोली रोड अखेर नव्याने होणार; नगरसेविका वैशाली अमित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

    July 3, 2026

    चोपड्यात जळगाव एलसीबीची मोठी कारवाई; गावठी कट्टा, मॅगझिनसह तीन जण अटकेत, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

    July 3, 2026

    शेतात पेरणी सुरू अन् क्षणात होत्याचं नव्हतं; विजेच्या तडाख्यात २१ वर्षीय तरुण ठार

    June 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.