Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » छत्रपती संभाजी नगरात दोन गटात राडा : ६४ जण अटकेत
    क्राईम

    छत्रपती संभाजी नगरात दोन गटात राडा : ६४ जण अटकेत

    editor deskBy editor deskJanuary 23, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था

    शहरातील एका परिसरात दोन गटात तुफान राडा झाला असून लाठ्या काठ्यांनी हाणामारी तसेच दगडफेक देखील करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 64 जणांना अटक केली आहे.

    रस्त्याच्या वादातून हा राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. दोन गटात तब्बल दीड तास दगडफेक सुरू होती, यात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी अश्रू -धुरांच्या नळकांड्यांचा देखील वापर केला.

    घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ही घटना पडेगावमधील आहे. एका घरासमोर 4 मुले बसल्याच्या कारणावरून दोन गटांत वादावादी झाली. या वादावादीचे रुपांतर लाठ्या-काठ्या आणि दगडफेकीमध्ये झाले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच उपायुक्त नितीन बगाटे यांच्या नेतृत्वात पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी आला. दोन्ही गटांतील 64 जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

    ‘गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यावरून वाद आहे. विरोधी गटाचे लोक रस्त्याने जाण्यापासून अडवणूक करतात. सोमवारी त्याच रस्त्याने जात असताना काहींनी वाद उकरून काढला. त्यानंतर 40 ते 50 लोकांनी हातातील लाठ्या-काठ्या, दांडे, लोखंडी रॉड, तलवारी आणि दगडाने मारहाण केली. या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले,’ असं शेख आरेफ यांनी आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवारांच्या विमान अपघातावर प्रश्नचिन्ह; रोहित पवारांची भावनिक पत्रकार परिषद

    February 10, 2026

    ‘सलमान खान उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त हिंदू’ : नितेश राणेंचा खोचक टोला

    February 10, 2026

    भावनिक पार्श्वभूमीत कॅबिनेट बैठक; अजित पवारांच्या प्रस्तावांवर शिक्कामोर्तब

    February 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.