Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » विटांनी भरलेले ट्रक उलटून एक ठार
    क्राईम

    विटांनी भरलेले ट्रक उलटून एक ठार

    editor deskBy editor deskJanuary 19, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर : प्रतिनिधी

    विटांनी भरलेले मालवाहू वाहन गटारीच्या ढाप्यावरून जात असताना तो ढापाच तुटला. त्यामुळे हे वाहन उलटले. यात विटांखाली दबला गेल्याने एक जण जागीच ठार झाला. तर, एक जण गंभीर जखमी आणि दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, म्हसावदवरून नेरी मार्गे अजिंठाकडे जाणारी एम.एच. ०४ डी.डी. ७७०९ ही विटांनी भरलेली गाडी नेरी दिगर येथील विकास सोसायटीजवळ समोर उभ्या असलेल्या कापसाच्या गाडीला ओव्हरटेक करत होती. त्याचवेळी रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारीवरून गाडी गेल्यामुळे गटारीचा ढापा तुटला आणि गाडी उलटी होऊन एक मजूर गाडी आणि विटांमध्ये दाबला जाऊन ठार झाला. श्याम तुळशीराम पाठे (वय ३२, रा. अजिंठा) असे मयताचे नाव आहे. तर सुनील गाटोगे हा गंभीर जखमी झाला. चालक सलमान खान युसूफ खान आणि एक जण जखमी झाला आहे. त्यांना जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात झाला त्यावेळेस मोठा आवाज झाल्यामुळे गावातील तरुणांनी मोठ्या संख्येने मदत करून मयत व जखमींना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मोहाडी रोड ते शिरसोली रोड अखेर नव्याने होणार; नगरसेविका वैशाली अमित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

    July 3, 2026

    चोपड्यात जळगाव एलसीबीची मोठी कारवाई; गावठी कट्टा, मॅगझिनसह तीन जण अटकेत, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

    July 3, 2026

    शेतात पेरणी सुरू अन् क्षणात होत्याचं नव्हतं; विजेच्या तडाख्यात २१ वर्षीय तरुण ठार

    June 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.