Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नाथाभाऊ 52 कशी सोने ; ना अजित पवार
    भुसावळ

    नाथाभाऊ 52 कशी सोने ; ना अजित पवार

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रDecember 17, 2021No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव हे अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे विशेष करून जळगावचे सोने हे 52 कशी साठी प्रसिद्ध आहे मात्र गॅस सोन्याची किंमत प्रत्येकालाच कळते असे नाही. जळगाव तसेच खान्देशचे नेते नाथाभाऊ हेसुद्धा बावन कशी सोने आहे त्यांची किंमत राष्ट्रवादीला पकडली व ते आमच्या खातर राष्ट्रवादीत आले त्याचा आम्हाला अभिमान आहे असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भुसावळ येथील राष्ट्रवादी काँग्रेस मेळाव्यात मार्गदर्शन करताना काढले .

    जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भुसावळ नगरपरिषद च्या विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर भुसावळ येथील डी एस हायस्कूल प्रगणावर राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा मेळावा संपन्न झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ राव खडसे, जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील , आ अनिल भाईदास पाटील, अरुण भाई गुजराथी  माजी आ गुलाबराव देवकर, डॉ सतिष अण्णा पाटील, रोहिणी खेवलकर खडसे, विजय मोतीराम चौधरी, माजी आ जगदीश वळवी,  याच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.

    यावेळी भुसावळ नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह नगरसेवक यांनी भाजपाला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यासोबतच रावेर फैजपूर सावदा या ठिकाणी अनेक नगरसेवक व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की,

    जळगाव जिल्हा सोन्यासाठी प्रसिद्ध आहे खास करून येथील सोने बावन्न कशी आहे त्याचप्रमाणे नाथाभाऊ सुद्धा बावनकशी सोने आहे असे उद्गार नामदार अजित पवार यांनी यावेळी काढले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणाऱ्या कार्यकर्त्यांना नाथा भाऊंनी व आपण सर्वांनी मिळून न्याय देण्याची व संधी देण्याची जबाबदारी घेऊ या एका पक्षाला नाथमुनि सर्वदूर पोहोचण्यासाठी सर्व घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी काम केले आहे त्यांच्याबरोबर जीवाभावाची सहकारी आहेत त्यांनाही येत्या काळात आपण जबाबदारी देऊयामागच्या काळात जिल्ह्यात सहा आमदार होते यावेळेस राष्ट्रवादीला थोडासा फटका बसला तसेच खानदेशातही फटका बसला जर नाथाभाऊ यांनी विधान परिषदेच्या पूर्वी हा निर्णय घेतला असता तर जिल्ह्यात नव्हे तर खानदेशात वेगळे चित्र असते जळगाव जिल्ह्याची परिस्थितीही बदलली असतील मात्र काही गोष्टी वेळेस घडलेल्या चांगले असतात त्याच पद्धतीने आज चांगले घडत आहे मागचे करत न बसता उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीत काही अनुभवी लोक पक्षात ताकद देऊन पुढे नेण्याचे काम करूया

    ज्या पक्षाला नाथा भाऊंनी वाढवले बहुजनांत पर्यंत पोहोचले त्याच वातावरणात त्या पक्षाने अपमानास्पद वागणूक दिली खोटेनाटे आरोप करून वेगळा चौकशा लावल्या यापूर्वी असे महाराष्ट्रात कधीच घडत नव्हते  यशवंतराव चव्हाणांपासून तर आजपर्यंत विरोधकांना त्रास देण्याचे काम घडले नव्हते ते आज घडत आहे मात्र ते विसरता हे चार दिवस सासूचे असतात त्याचप्रमाणे चार दिवस सुनेचे पण येत असतात कोणी ताम्रपट घेऊन जन्माला आलेला नाही असाही टोला यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी विरोधकांना लगावला जनता सर्वस्व आहे जनता डोक्यावर घेते कि जनता खवळली कि जनता काय करू शकते हे आपण पाहिले आहेत असेही ते म्हणाले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    संतापजनक : सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार : शाळेच्या सीसीटीव्हीट घटना कैद !

    December 4, 2025

    मुख्य मालकांवर कारवाई का नाही? ; अंबादास दानवेंनी सरकारला धरले धारेवार !

    December 4, 2025

    धक्कादायक : चार चिमुकल्यांचा खून एकाच पद्धतीने; आईच्या कबुलीनं थरकाप!

    December 4, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.