Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पाच लाखांची लाच घेतली अन वनपरिक्षेत्र अधिकारी अटकेत !
    क्राईम

    पाच लाखांची लाच घेतली अन वनपरिक्षेत्र अधिकारी अटकेत !

    editor deskBy editor deskJanuary 5, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    गडचिरोली : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक शहरात महसूल व पोलीस विभागात लाचखोरीचे जाळे वाढत असतांना आता वन विभागाच्या देखील एकाने लाच घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. हि कारवाई गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, रस्ते बांधकामावरील पकडलेल्या वाहनांवर ठोठावलेला 72 लाखांचा दंड कमी करण्यासाठी 10 लाखांची लाच मागणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. गुरुवारी रात्री उशिरा प्रमोद आनंदराव जेणेकर असे लाच घेतलेल्या अधिकाऱ्याचे नाव असल्याचे एसीबीने नमूद केले.

    प्रमोद जेणेकर आलापल्ली वनविभागांतर्गत येत असलेल्या पेरमिली येथे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत होता. या कारवाईने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. तक्रारदार हा कंत्राटदार आहे. त्याचे पेरमीली वनपरिक्षेत्रात येत असलेल्या तुमरगुंडा ते कासमपल्लीपर्यंत रस्त्याचे काम सुरू होते. काही दिवसांपूर्वी या कामावरील वाहने वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद जेणेकर यांनी पकडली होती. ती वाहने सोडण्यासाठी व आकारलेले 72 लाखांचा दंड कमी करण्यासाठी त्यांनी तब्बल 10 लाखांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोड अंती 5 लाख रुपये देण्याचे ठरले होते. दरम्यान एसीबीने जेणेकर यास अटक केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ढोल-ताशांच्या गजरात महाराष्ट्र रंगला

    March 3, 2026

    सोलापुरात महिला महाराष्ट्र केसरीचा रणसंग्राम!

    March 3, 2026

    जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

    March 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.