Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बंद घरात आढळले ५ मृतदेहांचे सांगाडे : परिसरात मोठी खळबळ
    क्राईम

    बंद घरात आढळले ५ मृतदेहांचे सांगाडे : परिसरात मोठी खळबळ

    editor deskBy editor deskDecember 29, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    देशातील अनेक मोठ्या शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना एक धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग याठिकाणी एका बंद पडलेल्या घरात तब्बल 5 मृतदेहांचे सांगाडे सापडल्याने मोठी खळबळ उडाली असून हे सर्वच्या सर्व 5 मृतदेह एकाच कुटुंबातील लोकांचे असल्याची शक्यता आहे. सदर व्यक्तीची हत्या झाली की त्यांनी आत्महत्या केली याबाबत अधिक माहिती समोर आलेली आहे. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.

    अर्धवट उघडलेल्या घराच्या दारात एक कवटी काही जणांना दिसल्याने ही घटना उघडकीस आली. पोलीस सदर घटनास्थळी पोचल्यानंतर त्यांनी मृताच्या नातेवाईकांशी आणि आसपासच्या लोकांशी चर्चा केली असता त्या कुटुंबातील लोक हे अनेक वर्षांपासून एकाकी जीवन जगत होते, कोणाशी मिसळत नव्हते तसेच गंभीर आजारांचा सामना संपूर्ण कुटुंब करत होते अशी माहिती पोलिसाना मिळाली. यापूर्वी 2019 मध्ये त्या कुटुंबाला आसपासच्या लोकांनी शेवटचं बघितलं होते. परंतु घराला कुलूप असल्याने त्यावेळी कोणीही पोलीस तक्रार वगैरे केली नव्हती.

    आज पोलिसांनी थेट घरात जाऊन बघितलं असता आतमध्ये काही तोडफोड झाल्याचे दिसले. एका खोलीत चार मृतदेह आढळले तर दुसऱ्या खोलीत महिलेचा सांगाडा सापडला. पोलिसांनी तात्काळ फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी बोलावून नमुने घेतले. तसेच इतर पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) टीम आणि सीन ऑफ क्राइम ऑफिसर्स (एसओसीओ) यांना बोलावून पाचारण करण्यात आलं आहे. याशिवाय तपासा दरम्यान, घराच्या आसपास कडेकोट सुरक्षा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
    पोलिसांनी प्राथमिक तपासाच्या आधार सदर मृतकांची ओळख जगन्नाथ रेड्डी, त्रिवेदी जगन्नाथ रेड्डी, कृष्णा रेड्डी , नरेंद्र रेड्डी, प्रेमा रेड्डी अशी केली आहे. परंतु पोस्ट मॉर्टम रिपोर्ट आणि फॉरेन्सिक अहवालानंतरच मृतांची अचूक ओळख पटेल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    चौकशीची वाट पाहणेच योग्य ; खा. सुप्रिया सुळे !

    February 12, 2026

    गेल्या चार महिन्यांपासून दादा एकटे – रोहित पवारांचे गंभीर प्रश्न !

    February 12, 2026

    फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; एनए परवानगीसाठी स्वतंत्र प्रक्रिया संपुष्टात

    February 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.