जळगाव : प्रतिनिधी
सामाईक भिंतीवर कपडे टाकण्याच्या कारणावरुन दोन महिलांमध्ये हाणामारी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये अल्का चंद्रकांत घुले (वय ५०, रा. वानखेडे हौसिंग सोसायटी) यांना बेदम मारहाण करीत गंभीर जखमी केले. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील वानखेडे हौसिंग सोसानटी परिसरात अल्का चंद्रकांत घुले या वास्तव्यास असून त्या नर्स म्हणून नोकरी करतात, त्यांच्या घराशेजारी असलेल्या उपषा उत्तम घुले यांच्यासोबत सामाईक भिंतीवर कपडे टाकण्याच्या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला, या वादातून उषा घुले व नितीन घुले यांनी अल्का घुले यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत अल्का घुले यांचा हात फ्रैक्चर झाला असून त्या गंभीर जखमी झाल्या. याप्रकरणी अल्का घुले यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दोन जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्र पाटील हे करीत आहे.



