Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावातील तीन घरांवर तलवारींनी हल्ला !
    क्राईम

    जळगावातील तीन घरांवर तलवारींनी हल्ला !

    editor deskBy editor deskDecember 28, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव शहरातील शिवाजी नगरातील हुडको, धनाजी काळे नगर व मकरा अपार्टमेंट परिसरात जुन्या वादाची खून्नस काढण्यासाठी मध्यरात्रीच्या सुमारास शस्त्रधारी टोळक्याने तीन जणांच्या घरावर तलवारींनी हल्ला केला. ही घटना घडली. ही संपुर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. परंतू पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एमआयडीसी परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास दोन गटात वाद झाले. परंतू पोलिसांनी या घटनेची दखल न घेतल्यामुळे त्याच दिवशी रात्रीच्या सुमारास शिवाजी नगरात पुन्हा हे दोन्ही गट एकमेकांच्या घरी जावून भिडले. त्यानंतर एका गटातील सुमारे दहा ते पंधरा जणांचे टोळके दुचाकीने हातात तलवारी घेवून शिवाजी नगर परिसरातील लक्ष्मीनगरात गेले. याठिकाणी त्यांनी शिवीगाळ एका जणाच्या घरावर हल्ला चढविला त्यानंतर हीच टोळी मकरा अपार्टमेंट समोरील परिसरात गेली. याठिकाणी हल्लेखोरांनी अज्ञात व्यक्तीच्या घरावर त्यांनी तलवारींनी हल्ला चढवित दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर धनाजी काळे नगरात राहणाऱ्या विशाल वाघ या तरुणाच्या घराच्या दिशेने निघाले. या टोळक्याने शिवीगाळ करीत विशाल वाघ याच्या घरावर हल्ला चढविला. यातील एका तरुणाने तलावार घेवून विशाल वाघ याच्या घराच्या गेटवर वार करीत हल्लेखोर तेथून पसार झाले.

    मंगळवारी दुपारच्या सुमारास महामार्गालगत असलेल्या जागेच्या कारणावरुन एमआयडीसी परिसरात दोन गटात वाद झाले. याठिकाणी या गटाने तरुणावर धारदार शस्त्राने वार केल्यामुळे याठिकाणी दोन गट एकमेकांना भिडले होते. या वादाचे पडसाद रात्रीच्या सुमारास शिवाजी नगरात उमटल्याने या घटनेला जागेच्या वादाची किनार असल्याची चर्चा पोलिसांमध्ये सुरु होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026

    दौलत नगर परिसरात तरुणाने आयुष्य संपविले !

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.