Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मुलाने केला बापाचा भरदिवसा खून : जळगाव जिल्हा हादरला !
    क्राईम

    मुलाने केला बापाचा भरदिवसा खून : जळगाव जिल्हा हादरला !

    editor deskBy editor deskDecember 10, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर : प्रतिनिधी 

    शेंदुर्णी येथील तरंगवाडी शिवारात वाटणीच्या वादातुन मुलाने बापाच्या डोक्यात पावडे घालुन यमसदनी पाठविल्याची धक्कादायक घटना घडली असून आरोपी मुलगा फरार आहे. तर आरोपीच्या मुलाने बापा विरोधात फिर्याद दिली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, येथील शेतकरी मयत नाना बडगुजर (वय ८२) हे सकाळच्या सुमारास शेतात कपाशी वेचत होते. ९ वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा आरोपी कैलास नाना बडगुजर (वय ५६) हा शेतात आला आणि वडीलांसोबत वाटणीवरून वाद घालू लागला. वडीलांनी नकार दिला असता त्यांच्यात शाब्दीक वाद झाला आणि आरोपी कैलास याने वडील नाना बडगुजर यांच्या डोक्यात भुसा भरण्याच्या पावडयाने डोक्यात जोरात वार करताच नाना बडगुजर हे जागेवरच कोसळले. आरोपीचा मुलगा आणि त्याची पत्नी शेतात काम करीत होते. विशाल याने डोक्यात वार केल्याचे बघताच धाव घेत आरोपी वडीलांच्या हातुन पावडे हिसकावून जखमी बाबांना सावरण्याचा प्रयत्न केला. ते कोणतीही हालचाल करीत नसल्याचे बघुन आरोपी याने शेतांमधुन पळ काढला. दरम्यान घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरल्याने घटनास्थळी धाव घेत पोलीसांना खबर दिली.

    शेंदुर्णी दुरक्षेत्रचे पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, शशिकांत पाटील पोकाँ. प्रशांत विरनारे, शशिकांत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत मयत यांना पहुर ग्रामिण रुग्णालयात हलविले आणि घटना स्थळाचा पंचनामा करीत साहित्य ताब्यात घेतले. तसेच आरोपी मुलगा कैलास बडगुजर याचा शोध सुरु असुन पथके रवाना करण्यात आली आहेत.

    सदर घटनेची फिर्याद आरोपीचा मुलगा विशाल कैलास बडगुजर (वय ३३) याने दिलेल्या फिर्यादीवरून भादवी कलम ३०२ नुसार गुरं ४९१ / ३०२ नुसार पहुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दिलीप पाटील करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव महानगरपालिकेच्या १७व्या महापौरपदी दीपमाला काळे, उपमहापौरपदी मनोज चौधरी

    February 6, 2026

    पोलीस–वन विभागात नोकरी लावण्याचे आमिष; चाळीसगावात ६ लाखांची फसवणूक

    February 6, 2026

    किरकोळ वादातून मारहाण ; शुभम सपकाळेचा उपचारादरम्यान मृत्यू

    February 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.