Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; पाचवी, आठवीची पुन्हा वार्षिक परीक्षा, नापास झाल्यास परत त्याच वर्गात
    शैक्षणिक

    विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; पाचवी, आठवीची पुन्हा वार्षिक परीक्षा, नापास झाल्यास परत त्याच वर्गात

    Team Live Maharashtra NewsBy Team Live Maharashtra NewsDecember 8, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई – इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी तोंडी प्रात्यक्षिक व लेखी स्वरूपाच्या वार्षिक परीक्षेचे स्वरूप निश्चित करण्यात आले आहे. परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यानंतर पूरक मार्गदर्शन करून पुनर्परीक्षा घेतली जाईल. मात्र तरीही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्याला त्याच वर्गात बसवले जाईल हा बदल 2023 24 या शैक्षणिक वर्षांपासून लागू राहणार आहे.

    दोन्ही इयत्तांसाठी प्रत्येक विषयासाठी 50 ते 60 गुणांसाठी ही परीक्षा होईल भाषा, गणित, परिसर अभ्यास या विषयांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे . कला कार्यानुभव या आधी इतर विषयांकरिता सध्या प्रचलित असलेले आकारिक मूल्यमापन केले जाईल. इयत्ता पाचवी आठवीच्या वार्षिक परीक्षेचे आयोजन द्वितीय सत्राच्या अखेरीस म्हणजे एप्रिल महिन्यात होईल आणि इतर वेतन समवेत त्यांचा निकाल जाहीर केला जाईल. किमान 35 टक्के गुण उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असणार आहे.

    2010 पासून शिक्षण हक्क कायद्यानुसार इयत्ता आठवी पर्यंत महाराष्ट्रात सातत्यपूर्ण मूल्यमापन पद्धती लागू करण्यात आली आहे. त्यानुसार एकच एक वार्षिक परीक्षा नुसार विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्याची पद्धत बंद करण्यात आली. मात्र यामुळे विद्यार्थी गुणवत्तेत मागे राहतात अशी ओरड सर्वत्र होऊ लागल्याने पाचवी आणि आठवी करिता पुन्हा वार्षिक परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आल्या परीक्षेत विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असल्यास सवलतीचे गुण दिले जातील मात्र तरीही तो एक किंवा एकाहून अधिक विषयात अनुत्तीर्ण होत असेल तर पुनर्परीक्षा घेतली जाईल.

    या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पूरक मार्गदर्शन केले जाईल पुनर्परीक्षा ही मूळ परीक्षा नुसारच असेल विदर्भ वगळता जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा परीक्षा घेण्यात येईल. पाचवी पर्यंत विद्यार्थ्यांना समकक्ष वर्गात प्रवेश दिला जाईल. सहावी ते आठवी प्रवेश द्यायचा असल्यास पाचवीची परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल.

    Annual Area Education Language Mathematics Practical Re-Examination Written गणित परिसर पुनर्परीक्षा प्रात्यक्षिक भाषा लेखी वार्षिक शिक्षण
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Team Live Maharashtra News

    Related Posts

    दिवाळी : लक्ष्मीपूजन कसे करावे? विधी आणि शुभ मुहूर्त!

    October 20, 2025

    ‘लाईव्ह महाराष्ट्र न्यूज’च्या बातमीचा दणका; शाळेत मद्यपान करणारा शिक्षक अखेर निलंबित !

    October 10, 2025

    ग्राहकांना बसला धक्का : दिवाळीच्या तोंडावर सोन्याच्या दरात मोठी वाढ !

    October 10, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.