Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चाळीसगाव पोलिसांची कारवाई : जुगार अड्यावर छापा
    क्राईम

    चाळीसगाव पोलिसांची कारवाई : जुगार अड्यावर छापा

    editor deskBy editor deskDecember 7, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी 

    शहरातील घाटरोडवरील छाजेड ओईल मिलजवळील कॉम्प्लेक्समधील भिंतीच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगार अड्यावर शहर पोलिसांनी छापा टाकून ९ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोकड असा सुमारे ७ हजार ४०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना काही लोक झन्ना मन्ना नावाचा पत्ता जुगाराचे खेळावर पैसे लावून जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पोलिस पथकाला कारवाईचे निर्देश दिले. उपनिरीक्षक सुहास आव्हाड, योगेश माळी, पोना. तुकाराम चव्हाण, पोकॉ. विनोद खैरनार, ज्ञानेश्वर पाटोळे, आशुतोष सोनवणे, नंदकिशोर महाजन, मोहन सूर्यवंशी यांनी मंगळवारी रात्री छापा टाकला. त्यात जुगार खेळताना विशाल बाबुराव मगरे, शेख शरीफ शेख मुसा, किरण भास्कर गायकवाड, अमोल सीताराम कोळी, उमेश खंडू पवार, राजू रघुनाथ भोई, गणेश शिवराम आगोणे, हरिश राजेंद्र भोई, सचिन भास्कर सोनवणे (चाळीसगाव) हे मिळून आले. याबाबतचा अधिक तपास पोलिस नाईक तुकाराम चव्हाण हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.